पाकमध्ये नाही तर सौदीमध्ये सर्वाधिक भारतीय कैदी

kaidi
भारताच्या दौऱ्यावर आलेल्या सौदी क्राऊन प्रिन्स मोहमद बिन सलमान याने पंतप्रधाम मोदी याच्या भेटीनंतर सौदीच्या तुरुंगात बंद असलेल्या ८५० भारतीय कैद्यांना मुक्त करणाची घोषणा केली आहे. सरकारने संसदेत परदेशातील तुरुंगात बंद असलेल्या भारतीय कैद्याची आकडेवारी जाहीर केली असून त्यानुसार मुस्लीम देशातील तुरुंगात सर्वाधिक भारतीय कैदी बंद आहेत. त्यातही पाकिस्तान पेक्षा सौदी तुरुंगात भारतीय कैदी अधिक प्रमाणात असून त्या खालोखाल मलेशिया, इराण या देशाचा नंबर आहे.

२०१७ आकडेवारीनुसार सौदीतील तुरुंगात ६०४८, मलेशियातील तुरुंगात ९१८ तर इराणी तुरुंगात १०२ भारतीय कैदी होते तर पाकिस्तानी तुरुंगात हे संख्या ४९८ आहे.

Leave a Comment