या आजोबांचे असे आहेत आपल्या नातीसाठी ‘बॉयफ्रेंड रूल्स’

boyfriend
आपली अपत्ये एका ठराविक वयामध्ये आल्यानंतर त्यांची भेट चुकीच्या व्यक्तीशी होऊ नये याची काळजी सर्वच पालकांना असते. त्यांनतर पुढेमागे अशी व्यक्ती आपल्या अपत्याच्या आयुष्यात आलीच तर हीच व्यक्ती आपल्या अपत्यासाठी बरोबर आहे का, ही काळजी सुरु होते. याच काळजी पायी अपत्याचा जोडीदार कसा असावा, त्याच्यामध्ये कोणते गुण असावेत, कोणते दुर्गुण नसावेत याची एक नियमावलीच पालक तयार करीत असतात. यामागे मुलांबद्दल असणारी काळजी हे कारण असले, तरी मुलांना मात्र या अटी जाचक वाटण्याची शक्यताच अधिक असते.
boyfriend1
स्कॉटलंड मधील लॅनार्कशायर येथे राहणाऱ्या एमी मॅकह्यु नामक एकवीस वर्षीय तरुणीसाठी तिचा जोडीदार कसा असावा हे सांगणारी लांबलचक नियमावली तिच्यासाठी तिच्या आजोबांनी तयार केली आहे. आपल्या आजोबांकडून व्हॉट्स अॅप वरून पाठविली गेलेली ही नियमावली एमीने इन्स्टाग्रामवरील तिच्या पोस्टमध्ये शेअर केली असून यावर लोकांच्या निरनिराळ्या प्रतिक्रिया पाहण्यास मिळत आहेत. एमीच्या आजोबांना तिची अतिशय काळजी वाटत असल्याने, तिला मिळालेला जोडीदार तिची फसवणूक तर करणार नाही याची सातत्याने चिंता करणाऱ्या तिच्या आजोबांनी तिच्यासाठी ही नियमावली तयार केली असल्याचे एमी म्हणते.
boyfriend2
‘बॉयफ्रेंड रूल्स’ य नावाने एमीच्या आजोबांनी ही नियमावली तिला पाठविली आहे. यामध्ये एमीच्या जोडीदाराची आर्थिक स्थिती उत्तम असून, त्याच्याकडे स्वतःची गाडी असावी ही अट आहेच, पण त्याशिवाय तो मनाने चांगला, इतर मुलींकडे वाईट नजरेने न पाहणारा आणि रोमन कॅथलिक हवा ही अट सर्वात मुख्य आहे. या शिवाय आजोबांना तो आवडायला हवा आणि त्यालाही आजोबा आवडायला हवे ही अटही आहेच. तसेच आजोबांच्या बरोबर कधी जेवायला रेस्टॉरंटमधे गेल्यास जेवणाचे बिल एमीच्या जोडीदाराने द्यायला हवे ही अट देखील आहे. आजोबांनी सध्या पुरत्या इतक्याच आपल्या ‘माफक’ अटी असल्याचे सांगून, आगामी काळामध्ये कदाचित या नियमावलीमध्ये भर पडण्याची शक्यता देखील आपल्या नातीला बोलून दाखविली आहे.

Leave a Comment