फोनचा ब्राइटनेस फुल ठेवल्याने तरुणीच्या डोळ्यांमध्ये झाले 500 हून अधिक छिद्र

mobile2
तायपेई – सध्याच्या घडीला तरुणाई स्मार्टफोनच्या आहारी गेले आहे असे म्हटले तर वावगे ठरु नये. पण आपल्यापैकी कित्येकजणांना रात्री झोपताना देखील आपल्या हातात मोबाईल लागतो. त्यातर काहीजण असे असतात की रात्रीच्या अंधारात मोबाईलचे ब्राइटनेस फुल करुन मोबाईलचा वापर करीत असता. पण असे करण्याचा फटका तैवानच्या एक तरुणीला बसला आहे. आपल्या ह्याच सवयीमुळे 25 वर्षीय चेन हिला रुग्णालय गाठावे लागले. आपल्या डोळ्यात आग होत असल्याची तक्रार तिने डॉक्टरांकडे केली. पण ज्यावेळी तिच्या डोळ्यांची चाचणी केली, त्यानंतर जे सत्य समोर आले त्यानंतर तिचे फ्युजच उडाले.
mobile1
चेनच्या डोळ्यांतील कॉर्नियामध्ये 500 हून अधिक छिद्र झाल्याचे चाचणीत स्पष्ट झाले. अन्नाचे जे हाल एखाद्या मायक्रोवेवमध्ये होतात तेच हाल तिच्या डोळ्यांचे मोबाईलसमोर राहून झाले आहेत. तिच्या डोळ्यांतील कॉर्निया मोबाईलमधून निघणाऱ्या सूक्ष्म उष्ण किरणांमुळे भाजले गेले. एका कंपनीमध्ये ही तरुणी सेक्रेटरी आहे. तिला आपल्या जॉबमुळे नेहमीच मोबाईल फोन हाताळावा लागतो. तिला मिनिटाला येणाऱ्या कॉल, मेसेज आणि ईमेलला उत्तर द्यावे लागतात. रात्री सुद्धा फोनचा ब्राइटनेस वाढवून वापरण्याची सवय नेहमीच अॅक्टिव्ह राहणाऱ्या या महिलेला झाली होती.
mobile
आपणही आंधारात मोबाईल किंवा स्मार्टफोनचे ब्राइटनेस फुल करून वापरत असाल तर वेळीच सावध व्हा. अन्यथा आपल्या डोळ्यांना सुद्धा अशाच स्वरुपाचा त्रास होऊ शकतो. रात्री उशीरा मोबाईल वापरणे टाळा. अत्यावश्यक असल्यास रात्री किंवा आंधारात ब्राइटनेस कमी ठेवा. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे, 300 ल्यूमेन्स पर्यंतचा प्रकाश डोळ्यांसाठी सुरक्षित आहे. चेन गेल्या 2 वर्षांपासून मोबाईल ज्या परिस्थितीत वापरत होती त्यानुसार ती रोज आपल्या डोळ्यांवर 600 ल्यूमेन्स प्रकाश टाकत होती.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment