
नेहमीच प्रेक्षकांना खळखळून हसवण्यात कॉमेडीचा किंग कपिल शर्मा यशस्वी ठरला आहे. पण सुनील ग्रोव्हरशी झालेल्या वादानंतर व्यसनी झाला आणि डिप्रेशनमध्ये गेला होता. आता कपिल शर्मा नव्या जोशासह आपल्या भेटीला आला आहे. सुनीलशी झालेल्या पंग्यानंतर हे दोघे भविष्यात परत एकदा काम करतील का असाच प्रश्न निर्माण झाला होतो. पण या दोघांना पुन्हा एकत्र आणण्याची किमया बॉलीवूडच्या भाईजान अर्थात सलमान खानने घडवली आहे.
डॉ. गुलाटीची लवकरच द कपिल शर्मा शोमध्ये एन्ट्री!
‘द कपिल शर्मा शो’चा सलमान खान निर्माता असल्याने सलमानचे कपिल व सुनील दोघेही जवळचे मित्र आहे. यावर्षी ईदच्या मुहूर्तावर सलमानचा आगामी चित्रपट ‘भारत’ प्रदर्शित होणार आहे. सुनील ग्रोव्हर सलमान खानच्या आगामी ‘भारत’ या चित्रपटामध्ये एका महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे शुटींग काही दिवसांत पुर्ण होऊन, चित्रपटाचे प्रमोशन सुरू होईल. सलमान आणि सुनील याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिलच्या शोमध्ये सहभागी होणार आहे. सुनील ग्रोव्हर प्रमोशनच्या निमित्ताने का होईना कपिलच्या शोमध्ये तो परतणार आहे.
