मागील 16 वर्षात 793 चित्रपटांच्या प्रदर्शनावर सेन्सॉर बोर्डाने घातली बंदी

censor-board
लखनौ – मागील 16 वर्षात केंद्रीय फिल्म प्रमाणन बोर्डाने अर्थात सेन्सॉर बोर्डाने 793 चित्रपटांच्या प्रदर्शानवर बंदी घातली असल्याचा खुलासा महितीच्या अधिकारात (आरटीआय) झाला आहे. याबाबत आरटीआय कार्यकर्ता नूतन ठाकूर यांनी माहिती मागितली होती. दरम्यान त्यांना मिळालेल्या उत्तरात सेन्सॉर बोर्डाने जानेवारी 2000पासून 31 मार्च 2016 पर्यंत 793 चित्रपटांना प्रमाणपत्र दिले नाही. यात 586 भारतीय आणि २०७ परदेशी चित्रपटांचा समावेश असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

यात सर्वाधिक हिंदी चित्रपटांचा समावेश असून त्यानंतर तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, पंजाबी चित्रपटांचा समावेश आहे. त्यांची आकडेवारी अनुक्रमे 231, 96, 53, 39, 23 आणि 17 अशी आहे. त्याचबरोबर 2015-16 यादरम्यान सर्वाधिक 153 चित्रपटांच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली. त्यानंतर 2014 – 15 मध्ये 152 चित्रपट, 2013 – 14 मध्ये 119 आणि 2012-13 मध्ये 82 चित्रपटांना सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र नाकारण्यात आले.

Leave a Comment