पाळीव मांजर आहे सुप्रसिद्ध फॅशन डिझायनरची वारस

cat
जागतिक पातळीवर लौकिक मिळविलेले सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर कार्ल लागरफील्ड यांच्या पाळीव मांजरीची ख्याती खुद्द एखाद्या सेलिब्रिटीसारखी आहे. कार्ल लागरफील्ड यांचे नुकतेच वयाच्या ८५व्या वर्षी निधन झाल्यानंतर त्यांची लाडकी, शौपेत नामक पांढरी शुभ्र बर्मीज मांजर आता कार्लच्या अफाट संपत्तीची वारस बनण्यास सिद्ध होत आहे. आठ वर्षांची ही अतिशय लाडाकोडाने वाढविलेली मांजर कार्ल यांनी त्यांच्या एका तरुण मित्राकडून आणली होती. कार्ल कडे आल्यापासून शौपेत केवळ खासगी जेट विमानाने प्रवास सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर कार्ल लागरफील्ड यांच्या अफाट संपत्तीची वारस पाळीव मांजर करीत आली आहे, तर तिच्या जेवणासाठी केवळ चांदीची भांडी वापरण्यात आली आहेत.
cat1
अतिशय लाडाकोडात वाढलेली शौपेत आता कार्ल यांच्या २०० मिलियन डॉलर्सच्या संपत्तीची वारस ठरणार असल्याचे बोलले जात आहे. आपल्या मृत्युनंतर शौपेतचे आयुष्य पूर्वीप्रमाणेच ऐषारामात जावे याची तरतूद कार्ल यांनी आपल्या मृत्युपत्रात करून ठेवली होती. त्यानुसार शौपेतच्या दिमतीला एक खासगी अंगरक्षक आणि दोन सेविका कायमस्वरूपी असणार आहेत. शौपेत हिच्यासाठी मृत्यूपत्रामध्ये तजवीज करून ठेवली असल्याचे कार्ल यांनी एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले होते.
cat2
तसे पाहिले तर कार्ल यांच्या मृत्युच्या पूर्वीपासूनच शौपेत अतिशय धनवान मांजर होती. कार्लच्या बरोबर काही मोठ्या ब्रँड्सच्या जाहिरातींमध्ये अवतरलेल्या शौपेतला वेगळे मानधन देण्यात आले असून, या मानधनाची एकूण रक्कम तीन मिलियन युरो असल्याचे कार्ल यांनी आपल्या मुलाखतीमध्ये म्हटले होते. शौपेतला जर कोणत्याही प्रकारची इजा झाली, तर त्याचे परिणाम तिच्या सेविकांना भोगावे लागतील अशी तरतूदही कार्ल यांनी आपल्या मृत्युपत्रामध्ये करून ठेवली असल्याचे समजते. दरम्यान शौपेतचे स्वतःचे फॅन फॉलोईंगही जबरदस्त असून, सोशल मिडीयावर तिचे १७०,००० फॉलोअर्स असल्याचे समजते.