घानाचा बाहुबली आर्मी ऑफिसर- रेमंड क्वाकू

remond
भीमकाय किंवा बाहुबली माणसे नेहमीच सर्वांच्या कुतूहलाचा आणि आरक्षणाचा विषय बनतात. मात्र लष्करी अधिकारी सर्वसामान्य समाजापासून थोडे दूर असतात असा अनुभव नेहमी येतो. आफ्रिकेतील घाना देशाचा एक लष्करी अधिकारी रेमंड क्वाकू याला थोडा अपवाद ठरला आहे. त्याला सर्वाधिक ताकदवान आर्मी ऑफिसर म्हणून निवडले गेले असून त्याने त्याचा बांधेसूद तरीही दमदार बॉडीचे अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत आणि त्याला हजारो लाईक मिळाले आहेत.

रेमंडने त्याचे अनेक व्हिडीओही शेअर केले आहेत. त्याला बाईक चालविणे आवडते तसेच तो सर्व प्रकारच्या क्रीडा प्रकारात आघाडीवर आहे. तो लष्करी जवानांना प्रशिक्षण देतो आणि सैनिकाचा गणवेश त्याला खूपच शोभून दिसतो. जिम मध्ये तासनतास घाम गाळणे हा त्याचा रोजचा कार्य्कार्म आहे. तो फिटनेस बाबत अतिशय दक्ष आहेच पण एखाद्या मॉडेल सारखा तो दिसतो. भरपूर उंची त्याच्या व्यक्तीमत्वाला अधिक उठाव आणतो. त्याने आत्तापर्यंत ३७४ पोस्ट केल्या असून त्याचे हजारो फॉलोअर्स आहेत.

Leave a Comment