
मुंबई : पासपोर्ट घोटाळा, ड्रग्स विकणारी टोळी, रिक्षा चालकांची दादागिरी उघड करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे सरचिटणीस नितीन नांदगावकर यांना काल मुंबई पोलिसांनी दोन वर्षे तडीपारची नोटीस बजावली. नांदगावकर यांनी त्यासाठी कायदा हातात घेतला असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. नांदगावकरांनी पासपोर्ट घोटाळ्यामुळे अनेकांची झालेली फसवणूक उघड केली होती. नांदगावकर यांची तडीपारी ऐन निवडणुकीच्या तोंडावर करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने या कारवाईला मनसेने विरोध केला आहे.
पोलीसांनी बजावली मनसे च्या नितीन नांदगावकर यांना तडीपारीची नोटीस
नांदगावकर यांनी या नोटिसीला उत्तर देताना संघर्ष अटळ असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. नेमकी कोणाला माझी भीती वाटत आहे? माझी भीती सर्वसामान्य नागरिकांना वाटते असा आरोप ठेऊन मला तडीपार करण्यासाठी मुबंई पोलीस कामाला लागले आहेत. मी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र माझा, त्यामुळे मला कुठे तडीपार? मी कुठे चुकलो हे जनतेनेच सांगावे, पण यापुढे देखील आपण अन्यायाच्या विरोधात आवाज उठवतच राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
