स्वित्झर्लंडमधील ट्रेन्समध्ये आता लहान मुलांसाठी ‘प्ले एरिया’ची सुविधा

train
स्वित्झर्लंड देशामध्ये आता खास लहान मुलांसाठी बनविले जाणारे प्ले एरिया शाळा, सार्वजनिक ठिकाणे यांच्या बरोबरच येथील ट्रेन्समध्ये ही समाविष्ट करण्यात आले आहेत. यामुळे लहान मुलांना सोबत घेऊन प्रवास करणाऱ्या पालक मंडळींचा प्रवास फारच सुकर झाला आहे. हा प्ले एरिया प्रत्येक लांब पल्ल्याच्या ट्रेनमधील एका स्वतंत्र कोचमध्ये तयार करण्यात आला असून, ‘जंगल’ या थीमवर या कोचची सजावट आधारित आहे. तसेच मुलांसाठी या कोचमध्ये घसरगुंड्या, आणि अनेक तऱ्हेच्या बोर्ड गेम्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
train1
हे खास प्ले एरिआ स्विस रेल्वेच्या वतीने सहा वर्षांच्या खालील मुलांसाठी डिझाईन करण्यात आले असून, सर्व डबल डेकर, लांबच्या पल्ल्याच्या ट्रेन्समध्ये या प्ले एरियाची सुविधा पुरविण्यात आली आहे. तसेच सहा वर्षांच्या वयापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी ट्रेन प्रवास मोफत करण्यात आला आहे. युरोपमधील इतर देशांच्या मानाने स्विस नागरिक ट्रेन्सने प्रवास मोठ्या प्रमाणवर करीत असतात. सर्वसाधारणपणे प्रत्येक स्विस नागरिक दरवर्षी सरासरी २४०० किलोमीटरचा ट्रेनप्रवास करीत असतो.
train2
आपापल्या खासगी वाहनांनी प्रवास करण्याच्या ऐवजी ट्रेनने प्रवास करण्याची मनोवृत्ती येथील नागरीकांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येत असल्याने येथे प्रदूषणाची मात्रा ही युरोपातील इतर देशांच्या मानाने कमी आहे. तसेच लांब पल्ल्याच्या ट्रेन्समध्ये सर्व सुविधा रास्त किंमतीला पुरविण्यात येत असल्याने स्विस नागरिक ट्रेन प्रवासाला जास्त प्राधान्य देताना आढळतात.

Leave a Comment