मायकेल जॅक्सनसारखे दिसण्यासाठी या पठ्ठयाने खर्च केले 21 लाख रुपये

michale-jackson
मायकेल जॅक्सन हा प्रसिद्ध अमेरिकन पॉप गायक होता, जो ‘किंग ऑफ पॉप’ म्हणूनही ओळखला जायचा. त्याच्या मृत्यूला आता 9 वर्षे उलटली आहेत, परंतु अजूनही जगभरात त्याचे अनेक चाहते आहेत. त्यांची उत्कट इच्छा अशी आहे की लोक त्याच्यासारखे गाणे आणि नृत्य करू इच्छित असतात. लोक त्याच्यासारखे दिसू इच्छित आहेत. त्यापैकी एक अर्जेंटाइन निवासी लिओ ब्लॅंको आहे, जो स्वतःला मायकेल जॅक्सनचा सर्वात मोठा चाहता म्हणतो.
michale-jackson1
22 वर्षीय लिओ ब्लॅंकोला मायकेल जॅक्सन एवढा आवडतो की त्याने त्याच्यासारखे दिसण्यासाठी 21 दशलक्ष डॉलर्स खर्च केले. गेल्या 7 वर्षांत त्याने 11 वेळा प्लास्टिक सर्जरी केली आहे जेणेकरुन तो मायकल जॅक्सनसारखा दिसू शकेल.
michale-jackson2
लियोने वयाच्या 15 वर्षीच मायकेल जॅक्सनसारखे दिसण्याचा निर्णय घेतला होता. एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या एका मुलाखतीत त्याने सांगितले, मी गेल्या 7 वर्षांत प्लास्टिक सर्जरी आणि इतर कॉस्मेटिक प्रक्रियेवर 30,000 डॉलर्स खर्च केले आहेत. ही रक्कम भारतीय चलनानुसार 21 लाखांपेक्षा जास्त आहे.
michale-jackson3
लिओच्या मते, त्याने केवळ नाकाची चार वेळा प्लास्टीक सर्जरी केली. याशिवाय, त्याने त्याच्या ठोसा आणि जबड्यांची शस्त्रक्रिया केली आहे. तो अजूनही त्याच्या लुकवर समाधानी नाही तरी त्याला वाटते की अजूनही स्वतःमध्ये काही बदल करण्याची गरज आहे. लिओला मायकेल जॅक्सनचा सर्वोत्कृष्ट डुप्लिकेट बनायचे आङे. लिओ म्हणतो की त्याने आपले तन, मन आणि धन मायकेल जॅक्सनचा डुप्लिकेट बनण्यासाठी लावले आहेत.
michale-jackson5
लिओ त्याचा लुक बदलून आनंदी आहे, पण त्याचा हा बदल त्याच्या कुटुंबासाठी थोडा त्रासदायक आहे. लियोची आई म्हणते की ती तिच्या मुलात झालेल्या बदलावामुळे चिंतित आहे. ती म्हणते, मी जेव्हा लिओकडे बघते तेव्हा मला वाटते की हा माझा मुलगा लिओच आहे का.

Leave a Comment