
एकमागून एक अभिनेता रणवीर सिंहने 2018-19मध्ये तीन सुपरडुपर हिट चित्रपट दिले असून त्यात पद्मावत, सिम्बा आणि आता रिलीज झालेला गली बॉय या चित्रपटाचा समावेश आहे. बॉक्स ऑफिसवर रणवीर सिंह आणि आलिया भट्ट अभिनीत गली बॉय बॉक्स ऑफिसवर धूमाकुळ घालत आहे. या चित्रपटाने गेल्या चार दिवसांत ७० कोटींचा टप्पा ओलांडला आहे.
चार दिवसात गली बॉयने ओलांडला एवढ्या कोटींचा टप्पा
या चित्रपटाच्या कमाई बाबतचे आकडे ट्रेड एक्स्पर्ट तरण आदर्श यांनी दिले असून त्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार रिलीजच्या पहिल्या दिवशी या चित्रपटाने १९.४० कोटींची कमाई केली. दुसºया दिवशी १३.१० कोटींचा गल्ला जमवला. यानंतर शनिवारी १८.६५ कोटींचा आकडा पार केला आणि काल रविवारी २१.३० कोटींचा बिझनेस करत थेट ७२.४५ कोटींपर्यंत मजल मारली. मुंबईच्या एका सामान्य रॅपरच्या आयुष्यावर बेतलेला हा चित्रपट विदेशातही बक्कळ कमाई करत आहे. धारावीत जगणा-या मुलांची कथा दिग्दर्शिका झोया अख्तरने पडद्यावर चितारली आहे.
