व्हॅलेंटाइन्स डे निमित्त या लहानग्याची आपल्या सर्वच शाळकरी मैत्रिणींसाठी आगळी भेट

school
‘व्हॅलेंटाइन्स डे’ नुकताच जगभरामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. हा दिवस केवळ प्रेमी जनांसाठीच नाही, तर आपल्याला ज्यांच्याविषयी आपुलकी आहे, त्यांच्याजवळ आपल्या भावना प्रकट करण्यासाठी साजरा केला जातो. मग ते नाते प्रेमाचे असो, वा मैत्रीचे असो, या नात्याच्यामागील भावना आपल्या जवळच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविणे हे या दिवसाचे महत्व. इंग्लंड मधील लिंकनशायर येथे राहणाऱ्या आठ वर्षांच्या कॅलम ड्र्यू याने ही यंदाचा व्हॅलेंटाइन्स डे आगळ्या पद्धतीने साजरा केला.
school2
कॅलमने या वर्षी आपल्या सर्व शाळकरी मैत्रिणींना व्हॅलेंटाइन्स डे साठी भेट म्हणून एक एक सुंदर गुलाबाचे फूल दिले. आनंदाचे आणि प्रेमाचे, आपुलकीचे प्रतीक असलेल्या या दिवशी शाळेतील कोणीही या आनंदापासून वंचित राहू नये या साठी आपण ही भेट सर्वांना दिली असल्याचे कॅलम म्हणतो. इतक्या लहान वयातच सर्वांच्या भावनांच्या विचार कॅलमने केला हे कौतुकास्पद आहेच, पण त्याशिवाय विशेष गोष्ट अशी, की या खास दिवशी सर्वांना भेट देण्यासाठी फुले आणताना त्यासाठी लागणारे पैसे आईवडिलांकडून न मागता, स्वतः कॅलमच्या कमाईचे होते.
school1
व्हॅलेंटाइन्स डे साठी फुले खरेदी करून सर्वांना भेट देण्याची परंपरा कॅलम गेली चार वर्षे निग्रहाने पाळत असून, या दिवशी फुले खरेदी करण्याकरिता आवश्यक असणारे पैसे कॅलमने स्वतः कमवित असतो. कॅलमच्या आजीच्या मालकीचे फुलांचे दुकान असून, मोकळ्या वेळामध्ये या दुकानामध्ये काम करून मिळालेल्या पैशांमधून कॅलमने सर्व फुले खरेदी करीत असे. पण गतवर्षी कॅलमच्या आजीचे निधन झाल्याने तिचे फुलांचे दुकानही बंद झाले. त्यामुळे यंदाच्या वर्षी पैसे जमा करण्यासाठी कार वॉशिंगचे काम कॅलमने स्वीकारले आणि भेटींसाठी पैसे एकत्र केले. त्यामुळे त्याने भेटीदाखल केवळ एक-एक फुलच जरी सर्व शाळकरी मैत्राणींना दिले असले, तरी याचे मोल किती तरी जास्त आहे, हे मात्र नक्की.