पाकड्यांचा पुळका घेणाऱ्या सिद्धुची साथ सोड कपिल

kapil-sharma
पुलवामात झालेल्या भ्याड हल्ल्याचा अवघा देश निषेध व्यक्त करत असतानाच माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी पाकिस्तानशी चर्चा करुन तोडगा काढवा असे वक्तव्य केल्यानंतर पाकिस्तानचा पुळका घेणाऱ्या सिद्धुला नेटकऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले. त्याचबरोबर त्याच्यासोबत नेटकऱ्यांनी कपिल शर्माला देखील सल्ला दिला आहे.

कपिल शर्माच्या शो मध्ये नवज्योत सिंग सिद्धु परीक्षक म्हणून दिसतात. त्यामुळे पाकिस्तानबद्दल जास्तच आपुलकी असलेल्या सिद्धुंसोबत काम करणे कपिल तु थांबव अन्यथा तुझा सुरु झालेल्या दुकानाला पुन्हा एकदा टाळे मारावे लागेल, असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

दरम्यान देशभरातून पाकिस्तानला जशास तसे उत्तर द्या, पाकिस्तानला धडा शिकवा अशी मागणी केली जाते असतानाच सिद्धू यांनी पाकिस्तानसोबत चर्चा केली पाहिजे अशी भूमिका घेतल्यामुळे त्यांना प्रचंड टीका सहन करावी लागली. पण त्यांना त्यांचे हेच वक्तव्य भोवले आहे. त्यांची कपिल शर्मा शोमधून हकालपट्टी करण्यात आली असल्याचे वृत्त टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीने दिले आहे

Leave a Comment