एका बगमुळे इंस्टाग्रामची लागली पुरती वाट !

instagram
सध्याच्या डिजीटल युगात प्रत्येक जण इंटरनेटशी जोडला गेला आहे. प्रत्येकजण सोशल मीडियाच्या आहारी गेला आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. त्यात प्रत्येकजण फेसबुक, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्रामवर कायमच अॅक्टिव्ह असतात. त्यातच फेसबुकची मालकी असलेले फोटो शेअरिंग अॅप इंस्टाग्राममध्ये मोठा बग आल्याचे वृत्त असून या बगमुळे इंस्टाग्रामची पुरती वाट लागली आहे. या बगमुळे इंस्टाग्राम युझर्सची संख्येत कमालीची घट झाली आहे. त्याचबरोबर यामुळे इंस्टाग्रामला युझर्सच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

इंस्टाग्रामने देखील बगसंबंधीच्या माहितीला दुजोरा दिला असून आपण लवकरच हा बग फिक्स करणार असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर या समस्येवर कायमचा तोडगा काढण्याच्या प्रयत्नात आम्ही असल्याचे कंपनीने सांगितले आहे. या बगमुळे आमच्या फॉलोअर्सची संख्या कमी झाल्याची तक्रार काही युझर्सनी आणि सेलिब्रेटींनी केली आहे.

दरम्यान सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सध्याच्या घडीला फेक अकाउंट डिलीट करण्याची मोहिम सुरु असून ती फेक अकाउंट्स डिलीट केल्यामुळेच फॉलाअर्सची संख्या कमी झाल्याचे दिसत असल्याचे कंपनीने सांगितले आहे. पण यावेळी हे फक्त एका बगमुळेच झाले असल्याची कबूली कंपनीने दिली आहे.

Leave a Comment