गाड्यांच्या टायरचा रंग का असतो काळा; तर लहानच्या मुलांच्या सायकलचे टायर रंगीत का

tyre
मित्रांनो, आपल्याला माहित आहे का आपल्याकडील लहान असो वा मोठी गाडी त्यांचे टायर हे काळ्या रंगाचे का असतात आणि लहान मुलांच्या सायकलचे टायर हे पांढरे, लाल, पिवळे किंवा इतर रंगाचे का असतात. पण टायरचे उत्पादन घेणाऱ्या कंपन्या टायरचा रंग पांढरा, पिवळा, निळा, हिरवा, गुलाबी किंवा इतर रंग का ठेवत नाही. कदाचित हा प्रश्न तुमच्या मनात कधी ना कधी आला असेल.
tyre1
भारतातच नव्हे तर परदेशात कारचे देखील काळ्या रंगाचे टायर्स असतात. त्याच्या मागे एक खूप खोल गुपित लपलेले आहे. टायरचे उत्पादन घेणाऱ्या सर्वच कंपन्या टायरचा रंग काळा ठेवण्यालाच पसंती देता. त्या मागे नेमके काय कारण हे आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत.
tyre2
तुम्हाला तर हे माहितच आहे की टायर रबरने बनवला जातो. पण त्याचा वास्तविक रंग हा राखाडी असतो, मग तो काळा कसा होतो? खरतर जेव्हा टायर बनविला जातो तेव्हा रबरचा रंग बदलला जातो आणि तो काळ्या रंगात परिवर्तित होतो. ज्या प्रक्रियेला व्हल्कनाइझेशन असे म्हणतात.
tyre3
टायर्स बनविण्यासाठी रबरमध्ये काळ्या रंगाचा कार्बन मिसळला जातो, जेणे करुन रबर जास्त घासला जावू नये. जर साधा रबर टायर 10,000 किमी चालू शकतो तर कार्बन समृद्ध टायर एक लाख किमी किंवा त्यापेक्षा जास्त चालू शकतो. जर टायरमध्ये सामान्य रबराचा वापर केला गेला तर तो लवकरच खराब होतो आणि जास्त काळ चालत नाहीत म्हणून यात ब्लॅक कार्बन आणि सल्फर मिश्रित केले जाते. ज्यामुळे टायर दीर्घ काळ चालतो.
tyre4
आपल्या माहितीसाठी ब्लॅक कार्बनच्या देखील अनेक श्रेणी आहेत. कोणत्या प्रकारचे कार्बन मिसळलेले आहे यावर रबर मऊ किंवा कठोर असेल हे अवलंबून असते. मऊ टायर पकडीमध्ये मजबूत असतात परंतु ते लवकर नष्ट होतात, परंतु कठोर टायर सहजतेने घासले जात नाहीत आणि दीर्घ दिवस टिकतात.
tyre5
टायर्स बनवताना त्या सल्फर देखील मिसळले जाते आणि कार्बन काळा असल्यामुळे अल्ट्रा-व्हायलेट किरणांपासूनही बचाव करण्यास सक्षम असतात. आपण कोणताही टायर जळताना निरखुन पाहिल्यास त्यातून निघणार धुर हा खुपच काळा असतो. कारण त्यात कार्बन आणि सल्फर असते.
tyre6
त्याचबरोबर आपण पाहिलेच असेल की लहान मुलांच्या सायकलींमध्ये पांढरे, पिवळे आणि इतर रंगाचे टायर्स असतात. याचे कारण म्हणजे लहान मुले एकतर रस्त्यावर सायकल चालवत नाही आणि त्यांच्या टायरमध्ये कार्बन मिसळला जाता नाही, त्यामुळे हे टायर जास्त दिवस टिकत नाही आणि लवकर त्याची झीज होते. या प्रकारच्या टायरला लोअर ग्रेड टायर देखील म्हणतात.

Leave a Comment