ही आहेत प्राचीन काळतील ‘पावर कपल्स’

couple
जगाच्या इतिहासामध्ये आजवर अनेक प्रभावी दाम्पत्ये होऊन गेली. राजनीती असो, वा विज्ञान, या दाम्पत्यांनी आपल्या कामगिरीने आपले नाव जगाच्या इतिहासामध्ये अजरामर केले. ख्रिस्तपूर्व ४८व्या शतकामध्ये इजिप्तची सौंदर्यवती साम्राज्ञी क्लिओपात्रा हिचे, इजिप्तचे राज्य कोणी हाती घ्यायचे यावरून तिच्या धाकट्या भावाशी वाद सुरु असताना मध्यस्थी करण्यासाठी रोमचा सम्राट ज्युलियस सीझरला पाचारण करण्यात आले. जर सीझरने त्याच्या सैन्याच्या जोरावर क्लिओपात्राला साम्राज्य मिळवून दिले, तर आपल्याकडे असलेल्या अमाप संपत्तीतील मोठा हिस्सा ज्युलियस सीझरला देण्याचे आश्वासन क्लिओपात्राने दिल्यावर ज्युलियस सीझरने व क्लिओपात्राने हातमिळवणी केली. या राजनैतिक संबंधांचे रूपांतर पुढे प्रेमात होऊन या दाम्पत्याला पुत्रप्राप्तीही झाली. अशा रीतीने ज्युलियस सीझरची हत्या होईपर्यंत क्लिओपात्रा आणि ज्युलिअस सीझर हे त्याकाळचे अतिशय बलशाली व प्रभावी ‘पावर कपल’ समजले गेले.
couple1
थिओडोरा वास्तविक एक सामान्य अभिनेत्री होती आणि जस्टीयॅनियनही एक सामान्य नागरिक होता. पण आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि महत्वाकांक्षेच्या जोरावर या दाम्पत्याने सहाव्या शतकामध्ये रोमचा पूर्वेकडील प्रांत आपल्या अधिपत्याखाली आणून स्वतःचे साम्राज्य येथे स्थापन केले. थियोडोरा ही त्या काळातील अतिशय बुद्धिमान स्त्री समजली जात असे. किंबहुना ती राज्याची सल्लागार असून सर्व राजकीय व्यवहार तिच्या निर्देशाप्रमाणेच होत असत. या दाम्पत्याच्या राजवटीत कॉन्स्टँटिनोपल येथील अनेक भव्य वास्तूंचे निर्माण करविण्यात आले होते.
couple2
सतराव्या शतकामध्ये भारतामधील मुघल साम्राज्याचे सम्राट शाहजहान आणि त्यांची पत्नी मुमताज महल यांच्या एकमेकांवरील प्रेमाची साक्ष देणारा ताजमहाल आजच्या काळातील जगातील आत आश्चर्यांपैकी एक आहे. शाहजहान आणि मुमताज यांचा विवाह १६१२ साली झाला असून, मुमताज ही शाहजहानची सर्वात प्रिय पत्नी होती. तिच्या स्मरणार्थ शाहजहानने ताजमहालाचे निर्माण करविले होते. नेपोलियनची पत्नी जोसफिन व नेपोलियन हे फ्रांसचे बलशाली शासक म्हणून ओळखले जात असत. राज्याला वारस न देऊ शकल्याने नेपोलियनने जोसफीनला घटस्फोट दिला असला, तरी त्यांचे परस्परांशी संबंध चांगले राहिले. किंबहुना जोसफिन ही राजनैतिक सल्लागार म्हणूनही कार्यरत होती. १८२१ साली मरणप्राय अवस्थेत नेपोलियनने फ्रान्सच्या सैन्याचे अधिपत्य जोसफिनच्या हवाली केले असल्याचा उल्लेख इतिहासात सापडतो. त्यामुळे एकोणिसाव्या शतकातील हे पावर कपल ठरले.
couple3
एकोणिसाव्या शतकातील सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ दाम्पत्य मारी व पियेर क्युरी यांना ‘विज्ञानाचे पावरहाउस’ म्हटले जाते. या दोघांची भेट १८९१ साली झाली, त्यावेळी मारी व पियेर फ्रांसमध्ये होते. एकमेकांच्या बुद्धिमत्तेने आणि व्यक्तिमत्वाने प्रभावित झालेले मारी आणि पियेर एकमेकांकडे आकृष्ट झाले. १८९५ साली दोघे विवाहबद्ध झाले. त्यानंतर दोघांनी आपापल्या वैज्ञानिक शोधांवर आपले लक्ष केंद्रित केले. त्यांच्या मेहनतीला लवकरच फळ मिळाले व या दाम्पत्याला, विज्ञानक्षेत्रातील त्याच्या अमूल्य कामगिरीबद्दल नोबेल पुरस्काराने सम्मानित करण्यात आले.

Leave a Comment