गूगलचे हे फिचर सांगेल तुमचा पासवर्ड सुरक्षित आहे की नाही

google1
जगातील सर्वात मोठे जाएंट सर्च इंजिन म्हणून ओळख असलेल्या गुगलवर एका चुटकी सरशी हवी ती माहिती मिळते. आपल्यापैकी अनेकजण दिवसभर आपल्या सोशल मीडियावर अकाऊंटवर सक्रिय असता. त्यातच प्रत्येकाचा आपला असा अनोखा पासवर्ड असतो. त्यातील आपल्यापैकी बहुतेकजण आपला पासवर्ड नियमित बदलतात का? तर त्याचे उत्तर आम्ही नाही म्हणून देऊ.

पण तुमच्या माहितीसाठी आम्ही सांगतो की तुमची ही सवय तुमच्यासाठी कधीतरी महागात पडू शकते आणि त्याचे तुम्हाला गंभीर परिणाम देखील भोगावे लागू शकतात. तुमचे महत्त्वाचे दस्तावेज, चॅट्स या पासवर्डच्या पलीकडे असतात. अशावेळी पासवर्ड हॅक होणे म्हणजे पश्चाताप केल्यासारखे होऊ शकते.

त्यासाठी आज आम्ही तुम्हाला काहीतरी नाविण्यपूर्ण माहिती शेअर करणार ज्यामुळे तुमचे सोशल मीडिया अकाऊंटसह मेल अकांऊट सुरक्षित राहू शकते. गुगलने यावर पर्याय म्हणून क्रोम ब्राऊजरवर एक फिचर दिले आहे ज्या वापर करुन तुम्ही तुमचा पासवर्ड हॅक होण्यापासून वाचवू शकता. या फिचरचे नाव गूगल पासवर्ड चेक असे आहे.

पहिल्यापासूनच गूगल क्रोमकडे पासवर्ड मॅनेजमेंट सपोर्ट सिस्टिम आहे. याचा अर्थ तुम्ही क्रोमचा वापर करुन पासवर्ड आणि युजरनेम जनरेट, स्टोर आणि अपडेट करु शकता. तुम्हाला यासाठी सेटिंग्जमध्ये जावे लागेल आणि पासवर्ड बॉक्सवर क्लिक करावे लागेल. गूगल पासवर्ड चेकअप फिचर सेकंड लेअर म्हणून काम करतो आणि तुम्हाला पासवर्ड बदलायला हवा किंवा नको हे सांगतो.

त्याचबरोबर गूगल एन्क्रिप्टेड डेटाबेसचा वापर कोणता पासवर्ड सुरक्षित आहे आणि कोणता नाही हे शोधून काढण्यासाठी करता येतो. कोणताही डेटा या प्रक्रिये दरम्यान लीक होत नाही. जर गूगलला तुमच्या पासवर्डमध्ये काही मॅच सापडले तर तो लगेच तुम्हाला पासवर्ड बदलाचा सल्ला देतो. तुम्ही जेव्हा कोणत्याही एखाद्या साईटवर लॉग इन करता आणि तुमचा युजरनेम आणि पासवर्ड देखील त्या 400 कोटी पासवर्ड किंवा युजरनेममध्ये जाते, जे असुरक्षित असते. त्यानंतरही गूगल तुम्हाला पासवर्ड बदलण्याचा सल्ला देतो.

Leave a Comment