अॅडमिनचा हा हक्क काढून घेणार व्हॉट्सअॅप

whatsapp
देशातील तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेल्या व्हॉट्सअॅपने आजवर आपल्या युझर्ससाठी अनेक नवनवीन फिचर आणले आहेत. पण यात अशी काही मंडळी आहेत ज्यांना व्हॉट्सअॅपमुळे त्रास होत आहे अशांसाठी व्हॉट्सअॅपकडून विचार केला जात आहे आणि त्यानुसार कंपनीकडून काही बदल केले जात आहे.

त्यात देशात सध्या व्हॉट्सअॅपवरुन व्हायरल होणाऱ्या फेक न्यूजवर लगाम लावण्यासाठी व्हॉट्सअॅपने फॉरवर्ड ऑप्शनवर काही बंधने घातली आहेत. व्हॉट्सअॅप आता लवकर एक फिचर घेऊन येणार ज्यामुळे कोणालाही कोणत्याही ग्रुपमध्ये जबरदस्तीने समाविष्ट केले जाऊ शकत नाही. ती व्यक्ती या ग्रुपमध्ये तिच्या संमतीनंतर समावेश केला जाऊ शकतो.

यासंदर्भात WABetaInfo ने दिलेल्या वृत्तानुसार, या फिचरवर व्हॉट्सअॅपकडून सध्या काम सुरु आहे. त्यामुळे कोणताही ग्रुप तयार करणार ग्रुप अॅडमिन कोणत्याही व्यक्तीला त्याच्या परवानगीविणा ग्रुपमध्ये समावेश करु शकणार नाही. त्यासाठी ज्याला ग्रुपमध्ये घ्यायचे त्या व्यक्तीला व्हॉट्सअॅपकडून एक मेसेज पाठविण्यात येईल त्या व्यक्तीने जर तो मेसेज स्वीकारला तर त्याचा ग्रुपमध्ये समावेश करता येईल.

व्हॉट्सअॅपच्या या नव्या फिचरमुळे अनेकांना अनावश्यक ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यापासून मोठा दिलासा मिळणार आहे. अनेक जण वेगवेगळे ग्रुप तयार करतात आणि त्यामध्ये न विचारता कोणालाही समाविष्ट केले जाते. व्हॉट्सअॅप ग्रुप आपल्या उपयोगाचा नसल्यावर अनेक लोक त्यातून बाहेर पडतात. आता या सगळ्यावर बंधने येणार आहेत. ग्राहकांना या फिचरचा उपयोग करण्यासाठी Settings > Account > Privacy > Groups यामध्ये जावे लागेल. ग्रुप्समध्ये तीन पर्याय उपलब्ध होतील. ग्रुपमध्ये कोण समाविष्ट करू शकेल, या आधारावर ते पर्याय उपलब्ध असतील. ग्राहकांना यापैकी एक पर्याय निवडावा लागणार आहे.

पर्याय १ निवडल्यास तुम्हाला ग्रुपमध्ये कोणीही समाविष्ट करू शकेल. तुमचा मोबाईल क्रमांक संबंधित व्यक्तीकडे सेव्ह असल्यास तो तुम्हाला त्याने तयार केलेल्या ग्रुपमध्ये समाविष्ट करू शकेल. पर्याय २ कॉन्टॅक्टमध्ये ज्यांचे मोबाईल क्रमांक आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह आहेत. तेच आपल्याला त्यांच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करू शकतात. त्यांचा क्रमांक जर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह नसेल, तर आपल्याला एक मेसेज येईल आणि तो स्वीकारल्यानंतरच आपण त्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये समाविष्ट होऊ. पर्याय ३ तुम्ही जर निवडला असेल, तर थेटपणे कोणीही तुम्हाला कोणत्याही ग्रुपमध्ये समाविष्ट करू शकणार नाही. प्रत्येकवेळी एक मेसेज तुम्हाला येईल आणि तो तुम्ही स्वीकारला तरच तुम्ही त्या ग्रुपमध्ये समाविष्ट व्हाल अन्यथा नाही.

Leave a Comment