आलिया-रणवीरच्या किसिंगवर सेन्सॉर बोर्डाची कातर

gully-boy
येत्या शुक्रवारी अभिनेता रणवीर सिंह आणि आलिया भट्ट यांच्या आगामी गली बॉय हा चित्रपट रिलीज होणार असून या चित्रपटातील काही दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला आहे. चित्रपटातील आलिया-रणवीरचा 13 सेकंदचा किसिंग सीन आणि काही आक्षेपार्ह संवाद काढून टाकण्यास सेन्सॉर बोर्डाने सांगितले आहे. आता तो सीन क्लोजऐवजी त्याऐवजी मोठ्या शॉटमध्ये दर्शविला जाईल. त्याच बरोबर या चित्रपटात एका दारुचे ब्रांडिंग देखील केले होते. त्याचबरोबर शिव्यांचा देखील भरपूर प्रमाणात वापर केला आहे. ते देखील काढून टाकण्यास सेन्सॉर बोर्डाने सांगितले आहे. गली बॉयचे दिग्दर्शन झोया अख्तरने केले आहे. या चित्रपट व्हॅलेंटाईनच्या दिवशी रिलीज होणार आहे.

Leave a Comment