मी लपून राहू इच्छित नाही – सलमान रश्दी

salman-rushdie

इराणचे धर्मगुरू अयातुल्ला रुहोल्ला यांच्या फतव्यामुळे अनेक दशके लपून राहणारे प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांनी आपली वेदना व्यक्त केली आहे. मला लपून राहण्याची इच्छा नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

पॅरिस येथे आलेले रश्दी यांनी एएफपी वृत्तसंस्थेशी खास संवाद साधला. यावेळी त्यांनी वरील वक्तव्य केले.

इराणमध्ये इस्लामी क्रांती करणारे धर्मगुरु खोमेनी यांनी 14 फेब्रुवारी 1989 रोजी रश्दी यांच्या विरोधात फतवा जारी केला होता. रश्दी यांनी लिहिलेल्या सॅटॅनिक व्हर्सेस या पुस्तकात ईशनिंदा करण्यात आल्याचा आरोप खोमेनी यांनी केला होता. तेव्हापासून दर 14 फेब्रुवारी रोजी इराणकडुन हा फतवा जारी केला जातो.

त्यानंतर 13 वर्षे रश्दी हे नाव बदलून आणि पोलिसांच्या संरक्षणात वावरत होते. आता त्यांना कोणताही धोका नाही, असे इराणने स्पष्ट केल्यानंतर 2001 पासून त्यांनी खोटे नाव वापरणे बंद केले. मात्र एएफपीने पॅनेलमध्ये त्यांची मुलाखत घेतली त्यावेळी बाहेर साध्या वेषातील पोलिस उभे होते. रश्दी यांच्या फ्रेंच प्रकाशकाच्या कार्यालयात ही मुलाखत झाली.

माझ्या पुस्तकाचे चुकीचे आकलन करण्यात आले, असे ते म्हणाले.

सॅटॅनिक व्हर्सेस हे रश्दी यांचे पाचवे पुस्तक होते, तर आता त्यांचे 18वे पुस्तक ‘द गोल्डन हाउस’ प्रकाशित होणार आहे.

Leave a Comment