अमिताभ बच्चन आणि तापसीच्या ‘बदला’चा ट्रेलर रिलीज

badla
पिंक या चित्रपटानंतर महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री तापसी पन्नु ही पुन्हा एकदा आपल्या भेटीला येत आहे. नुकताच त्यांच्या आगामी बदला या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये असलेले दमदार संवादामुळे हा ट्रेलर चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवते.

या चित्रपटातही अमिताभ बच्चन वकिलाची भूमिका साकारत आहेत. याआधी त्यांनी ‘पिंक’ चित्रपटातही वकिलाची भूमिका साकारली होती. तापसी चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एका मर्डर केसमध्ये फसलेली दिसत आहे. तिला सोडविण्यासाठी बिग बी कशाप्रकारे ही केस लढतात, हे या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.

चित्रपटाच्या ट्रेलरमधील काही दमदार संवादही लक्षवेधक ठरले आहेत. ‘बदला लेना हर बार सही नही होता, लेकीन माफ करना भी हर बार सही नही होता’, ‘सच वही जो साबित हो सके’ हे संवाद चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढवतात. ‘बदला’ चित्रपटाचे दिग्दर्शन सुजॉय घोष हे करत आहेत. हा चित्रपट ८ मार्चला प्रदर्शित होणार आहे.