जग्गी वासुदेव गुरु ना बाईकचा मोह आवरेना

jaggi
अध्यात्मिक योगगुरु जग्गी वासुदेव यांचे शिष्य आणि चाहते जगभरात आहेत. योग आणि अध्यात्म यांचा सुरेख मेळ घालणाऱ्या जग्गी वासुदेव यांच्या समोर नतमस्तक होणाऱ्यामध्ये बॉलीवूड, पोलिटिकल, उद्योजक, पत्रकार असे अनेक सेलेब्रिटी आहेत. मोह माया त्याग करा असे सांगणारे हे गुरु. सर्वसंग परित्याग पटवून देणारे जग्गी वासुदेव यांना एक शौक आहे आणि त्यामुळेही ते वारंवार चर्चेत येतात.

जग्गी वासुदेव यांना वेगवान मोटारबाईकची अतोनात आवड असून त्यांना हा मोह दूर सारता आलेला नाही. नुकतीच त्यांनी डूकाटी मल्टीस्ट्राडा १२०० ही २१.४२ लाख रुपये किमतीची बाईक खरेदी केली आहे. योगगुरू रामदेवबाबा वासुदेव यांच्या आश्रमाला नुकतीच भेट देऊन आले तेव्हा जग्गी वासुदेव यांनी रामदेवबाबाना या बाईकवर मागे बसवून संपूर्ण आश्रमाला फेरी मारली असे समजते. जग्गी वासुदेव यांनी खरेदी केलेली हि लिमिटेड एडिशन बाईक असून तिची काहीच युनिट भारतात विक्रीसाठी होती.

जग्गी वासुदेव यांना कॉलेजमध्ये असल्यापासूनचा वेगवान बाईकचा शौक आहे. त्या दिवसात ते येझदी वापरत असत. यापूर्वी त्यांचे बीएमडब्ल्यू आरजी १२०० एस चालवीत असल्याचे फोटोही झळकले आहेत. त्यांना डर्ट बाईक विशेष आवडतात आणि मुंबईच्या रस्त्यावर त्यांना या बाईक चालविताना पहिले गेले आहे.

Leave a Comment