ड्रायव्हरसीट नसलेली केटीएमची इलेक्ट्रिक स्कूटर

ktm
भविष्यातील वाहने म्हणून सध्या इलेक्ट्रिक वाहनांकडे पहिले जात आहे. परिणामी जगभरातील दुचाकी आणि चारचाकी वाहन उत्पादक कंपन्या इलेक्ट्रिक वाहन निर्मितीमध्ये गुंतल्या आहेत. केटीएम कंपनी त्याला अपवाद नसून त्यांनी तयार केलेली एक वेगळी इलेक्ट्रिक स्कूटर चाचण्या सुरु असताना रस्त्यावर दिसली आहे. या स्कूटरचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत.

विशेष म्हणजे या स्कूटरला ड्रायविंग सीट नाही. म्हणजे उभे राहून ही गाडी चालवायची आहे. फ्रंटला मोठे व्हील दिले गेले आहे तर रिअरला छोटे टायर दिसते आहे. हर्ले डेव्हिडसनच्या इलेक्ट्रिक स्कूटर प्रमाणे केटीएमच्या या स्कूटरचा बॅटरी पॅक तिच्या फ्लोअर बोर्डवर आहे. उजवीकडे एक बेल्ट एनर्जी रिकव्हरिंग सिस्टीमची जोडलेला आहे आणि फुल्ली डिजिटल टीएफटी इंस्ट्रमेंट क्लस्टर हँडल बारवर दिले गेले आहे.

केटीएमने २०१३ साली टोक्यो मोटर शो मध्ये ई स्पीड सादर केली होती. तिचा टॉप स्पीड ताशी ८० किमी होता आणि ती फुलचार्ज मध्ये ६४ किमी जाऊ शकत होती. दोन तासात ती पूर्ण चार्ज होते असे समजते.

Leave a Comment