प्रेक्षकांच्या भेटीला ‘मेरे प्यारे प्राइम मिनिस्टर’चा ट्रेलर

mppm
नुकताच बहुचर्चित ‘मेरे प्यारे प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला असून या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी केले आहे. राकेश मेहरा यांनी ‘रंग दे बसंती’, ‘भाग मिल्खा भाग’, ‘मिर्ज्या’ आणि ‘दिल्ली ६’ या दमदार चित्रपटानंतर ‘मेरे प्यारे मिनिस्टर’ या चित्रपटातून स्वच्छता तसेच महिला सुरक्षा आणि इतर गंभीर विषयांवर चित्रपट घेऊन आले आहेत.

बालकलाकारांची भूमिका ‘मेरे प्यारे प्राईम मिनिस्टर’च्या ट्रेलरमध्ये लक्षवेधक ठरली आहे. पंतप्रधानांना भेटण्यासाठी असलेला त्यांचा निरागस प्रयत्न या ट्रेलरमधून पाहायला मिळतो. आईवर झालेल्या अत्याचाराचा जाब विचारण्यासाठी थेट पंतप्रधानांना भेटण्याची इच्छा या ट्रेलरमधून पाहायला मिळते.

या चित्रपटाच्या ट्रेलरची लिंक ट्विटरवर चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी शेअर केली आहे. अंजली पाटील, मकरंद देशपांडे, रसिका अगाशे, सोनिया अल्बिजुरी, अतुल कुलकर्णी आणि नचिकेत पूर्णापत्रे या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटात आहेत. शंकर-एहसान-लॉय यांनी चित्रपटाला संगीत दिले असून गीतांचे शब्द गुलजार यांच्या लेखणीतून अवतरले आहेत. डॉ. जयंतीलाल गडा आणि पीव्हीआर सिनेमा या चित्रपटाची निर्मिती एकत्रितपणे करत आहेत. १५ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.