ही आहेत जगातील सर्वात महागडी टेडी बेअर्स

teady
सध्या सर्वत्र व्हॅलेंटाइन वीकची धूम सुरु आहे. या आठवड्यातील सर्व दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीला काही ना काही भेटवस्तू देण्याची प्रथा असून, प्रत्येक भेटवस्तू एका खास दिवशी दिली जाण्याची पद्धत आहे. या प्रत्येक दिवशी दिल्या जाणाऱ्या वस्तूचे विशेष महत्वही आहे. या दिवसांपैकी एक दिवस हा ‘टेडी बेअर डे’ म्हणून साजरा केला जात असून, या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीला एक छानसे टेडी बेअर देण्याची पद्धत आहे. हे टेडी बेअर आपल्या प्रिय व्यक्तीला आपल्या प्रेमाचे प्रतीक म्हणून भेट देण्याची पद्धत गेली अनेक दशके रूढ आहे. ही खास भेटवस्तू देण्यासाठी जगभरामध्ये अशा अनेक व्यक्ती आहेत, ज्यांनी ही भेट खरेदी करण्यासाठी अमाप संपत्ती खर्च करण्यासही मागेपुढे पाहिले नाही.
teady1
हीच ट्रेंड लक्षात घेऊन ‘लुई व्हीतॉ’ सारख्या जगभरातील मोठमोठ्या फॅशन हाऊसेसनी अतिशय किंमती टेडी बेअर्स बाजारात आणली असून, या पैकी एका टेडी बेअरची किंमत तब्बल १०६,०१६.६८ अमेरिकन डॉलर्स, म्हणजेच तब्बल पंच्याहत्तर लाख रुपये होती. हे टेडी बेअर लुई व्हीतॉ आणि सुप्रीम या दोन मोठ्या ब्रँड्स तर्फे संयुक्तपणे बाजारामध्ये आणले गेले असून, २८ इंच उंचीचे हे टेडी बेअर आहे. याच्या विक्रीतून आलेल्या किंमतीचा काही भाग ‘चिल्ड्रेन इन नीड’ या बालकल्याणसंस्थेलाही देण्यात आला आहे.
teady2
जगातील सर्वात जुने टेडी बेअर १९०४ साली बनविले गेले असून, या टेडी बेअरच्या विक्रीसाठी झालेल्या लिलावामध्ये या टेडी बेअरला चक्क ७४ लाख रुपये किंमत मिळाली असल्याचे समजते. ‘हार्लेक्वीन बेअर’ नामक टेडी बेअरची किंमत त्रेचाळीस लाख रुपये असून, हे टेडी बेअर रंगेबिरंगी आहे. त्याचप्रमाणे ‘डायमंड आईज बेअर’ हे टेडी बेअर सोनेरी फरने बनविले असून, या टेडी बेअरचे नाक अस्सल सोन्याचे आहे. तसेच हिरे आणि सॅफायर या मौल्यवान रत्नांचा वापर करून या टेडी बेअरचे डोळे बनविण्यात आले आहेत. या टेडी बेअरची किंमत चोवीस लाख रुपये आहे.
teady3
स्टाइफ नामक लहान मुलांसाठी खेळणी बनविण्याऱ्या कंपनीच्या वतीने ‘स्टाइफ-कार्ल लागरफेल्ड टेडी बेअर’ बाजारात आणले गेले असून, या टेडी बेअरने अतिशय देखणा काळ्या रंगाचा सूट परिधान केला असून याच्या डोळ्यांवर स्टायलिश गॉगल्सही आहेत. या टेडी बेअरची किंमत सुमारे पंचवीस लाख रुपये आहे.

Leave a Comment