‘या’ बॉलीवूड स्टार्सना आहे काही तरी नवीन शिकण्याची इच्छा

celebs

आयुष्यामध्ये सतत काही तरी नवे करत राहिल्याने आयुष्य कंटाळवाणे होत नाही आणि काही तरी नवे करण्यासाठी आणि शिकण्यासाठी वयाची अटही नसते. याच सूत्राचा अवलंब करून बॉलीवूडमध्ये मोठे यश संपादन केलेले कलाकारही काही तरी नवे शकण्याची इच्छा मनामध्ये बाळगून आहेत.

Yami-Gautam

अभिनेत्री यामी गौतम हिला शारीरिक फिटनेस बद्दल सातत्याने काही तरी नवे माहित करून घेण्यास आवडते. त्याचप्रमाणे स्वतःला फिट ठेवण्यासाठी नवनवे व्यायामप्रकार शिकणेही तिला आवडते. मागील वर्षी यामीने पोल डान्सिंगचे धडे घेतले असून, याही वर्षी स्वतःला फिट ठेवण्यासाठी काही तरी नवे शिकण्याची तिची इच्छा आहे. यासाठी कोणता तरी नवा नृत्य प्रकार शिकून घेण्याचा तिचा मानस आहे.

anushka-sharma
अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला मूर्तीकला (sculpting) आणि पॉटरी (मातीच्या वस्तू तयार करणे) यांची अतिशय आवड असून, गेल्या अनेक दिवसांपासून या कला शिकून घेण्याची तिची इच्छा आहे. त्यामुळे चित्रीकरणाच्या व्यस्त शेड्युलमधून थोडी उसंत मिळताच या दोन्ही कलांचे धडे घेण्याचे अनुष्काने ठरविले आहे. सुप्रसिद्ध संगीतकार शेखर रावजियानी याला ‘चिल्ला’ नामक कठोर संगीतसाधना करण्याची इच्छा आहे. अनेक संगीत घराण्यांमध्ये संगीताचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या कठोर साधनेचा अवलंब करावा लागतो. ही संगीत साधना सतत चाळीस दिवस चालत असून, या काळामध्ये दिवसाचे अनेक तास संगीताचा रियाझ केला जातो. अशी ही कठोर संगीत साधना शेखर यांना करण्याची इच्छा आहे.

Neena-Gupta
‘बधाई हो’ या काही काळापूर्वीच प्रदर्शित झालेल्या चित्रपटामध्ये आपली भूमिका अतिशय उत्कृष्ट रित्या साकारलेली अभिनेत्री नीना गुप्ता यांना साल्सा नृत्य शिकण्याची इच्छा आहे. नीना ने आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीला कत्थक नृत्यशैलीचे प्रशिक्षण घेतले असून, नृत्य आणि संगीतामध्ये त्यांना विशेष रुची आहे. आता नीना यांना साल्सा शिकण्याची इच्छा असून, हा नृत्यप्रकार आपल्याला अतिशय आवडत असल्याचे नीना म्हणतात. हा नृत्य प्रकार आपल्याला जमेल किंवा नाही हे ठाऊक नसले, तरी हा शिकण्याचा प्रयत्न आपण नक्की करणार असल्याचे नीना म्हणतात.

Vicky-Kaushal
सध्या ‘उरी’ चित्रपटाच्या यशाने लोकप्रियतेचे शिखर गाठलेला अभिनेता विकी कौशल याला पियानो आणि ड्रम्स वादन शिकण्याची इच्छा आहे. सध्या आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त असल्याने आपल्या आवडत्या गोष्टी करण्यास किंवा शिकण्यास पुरेसा वेळ मिळत नसल्याचे सांगून, येत्या वर्षी चित्रीकरणाचे वेळापत्रक सांभाळतानाच पियानो आणि ड्रम्स शिकण्यासाठी ही वेळ देण्याची इच्छा असल्याचे विकी म्हणतो.

Leave a Comment