सुशांत सिंह राजपूतच्या ‘सोन चिडिया’ दुसरा ट्रेलर रिलीज

sushant-singh-rajput
सुशांत सिंह राजपुतच्या बहुप्रतीक्षित आगामी ‘सोन चिडिया’ चित्रपटाचा दुसरा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. प्रेक्षकांच्या चित्रपटाकडून या ट्रेलरमुळे अपेक्षा वाढल्या आहेत. सुशांत सिंह राजपूत यात दरोडेखोराच्या भूमिकेत दिसत आहे. तर मनोज वाजपेयी साकारत असलेली भूमिकादेखील खूपच तगडी आहे.

भरपूर स्टंट्स आणि अॅक्शनचा थरार चित्रपटात पाहायला मिळत आहे. अभिषेक चौबे यांनी सुशांत, मनोज बाजपेयी, भूमी पेडणेकर, रणवीर शौरी आणि आशुतोष राणा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ‘सोन चिडीया’ चित्रपटाची लिंक आपल्या ट्विटरवर शेअर केली आहे.

Leave a Comment