मुंबईतील संशोधकांनी विकसित केले तयार अन्न तीन वर्ष टिकवण्याचे तंत्रज्ञान

food
मुंबई : पुढचे तीन वर्षंही तुम्ही आज घरी केलेला ढोकळा, डोसा, केक खाऊ शकाल, अशी शक्यता आहे. एक इडली यासंदर्भात संशोधन करुन तयार करण्यात आली आहे. चक्क तीन वर्षांपूर्वी तयार केलेली ही इडली आहे. आता इडली चक्क तीन वर्षं टिकणार आहे, असे महत्त्वाचे संशोधन झाले आहे. मुंबई विद्यापीठाच्या भौतिक शास्त्र विभागातल्या संशोधकांनी तयार अन्न हे जास्त काळ ते सुद्धा तब्बल तीन वर्ष टिकवता येईल, असे तंत्रज्ञान विकसित केले आहे.

तीन वर्षानंतरही या तयार अन्नाची चव ही अन्न पदार्थ अगदी ताजा वाटेल, अशी असल्याचा संशोधकांचा दावा आहे. हे संशोधन इलेक्ट्रॉन बीम रेडिएशन या तंत्रज्ञानाचा वापर करत करण्यात आले आहे. भौतिकशास्त्राच्या विभाग प्रमुख डॉ. वैशाली बांबोले यांनी याबाबत नेमके तंत्रज्ञान काय आहे याची माहिती दिली. याबाबत त्या सांगतात हे पदार्थ लष्करासाठी, अवकाशात अंतराळवीरांसाठी वापरता येऊ शकतात.

या संशोधनासाठी कमी प्रोटिन आणि कमी तेल असलेले तयार अन्न हे पदार्थ निवडण्यात आले होते. विशेष म्हणजे या संशोधनात preservative म्हणजेच परिरक्षक वापरण्यात आलेले नाही. हे अन्न पदार्थ साध्या फ्रीजमध्येही साठवता येणार आहेत. या संशोधनाचे पेटंट मिळावे यासाठी अर्ज करण्यात आला आहे. हे जर यशस्वी झाले तर असे अनेक पदार्थ वर्षानुवर्षं टिकवणे शक्य आहे.

Leave a Comment