‘या’ मंदिरात पाण्यापासुन लागतो दिवा

temple-lamp
अनेक असे चमत्कार घडतात की ज्यामुळे आपला देवावरील विश्वास आणखीनच दृढ होतो. असाच एक चमत्कार देवीच्या मंदिरात घडत आहे. या मंदिरात दिवा लावण्यासाठी तुप किंवा तेलाची आवश्यक नसते. कारण येथे दिवा पाण्यापासुन लावला जातो.
temple-lamp1
मीडिया अहवालानुसार, मध्य प्रदेशच्या शाजापूर जिल्ह्यातील गडियाघाट माताजी म्हणून प्रसिध्द असलेले हे मंदिर कालीसिंध नदीच्या काठावर नलखेडा गावापासून सुमारे 15 किमी अंतरावर गाडिया गावाजवळ वसलेले आहे.
temple-lamp4
मंदिराच्या पुजाऱ्याचा दावा आहे की, या मंदिरात जळत असलेल्या महाज्योतिला जळण्यासाठी तुप, तेल किंवा इतर इंधनाची गरज भासत नाही. तर हा दिवा चक्क पाण्याने जळतो.
temple-lamp3
पुजारी सिद्धासिंह सांगतात की, सुरुवातीला दिवा तेलानेच जळत होता, पण सुमारे पाच वर्षांपूर्वी देवीने स्वप्नात दर्शन देऊन दिवा पाण्याने लावण्यास सांगितले. मातेच्या आदेशानुसार या पुजारीने असेच केले.
temple-lamp2
सकाळी उठल्यानंतर पुजाऱ्याने मंदिराच्या जवळील कालीसिंद नदीचे पाणी दिव्यात टाकले आणि दिवा पेटवला. यानंतर पुजारी घाबरून गेले आणि जवळजवळ दोन महिने त्यांनी याबद्दल कोणालाही काही सांगितले नाही. नंतर त्यांनी गावातील लोकांना या बद्दल सांगितले तर त्यांना विश्वास बसला नाही, पण नंतर गावातील लोकांनी ही पाहिले की दिव्यात पाणी टाकल्यावर दिवा जळत आहे. तेव्हापासून या चमत्काराला बघण्यासाठी देश- विदेशातील अनेक लोक या ठिकाणी येत आहेत.

Leave a Comment