सोशल मीडियात व्हायरल झाला प्रिया प्रकाशचा किसिंग सीन

priya-prakash
गेल्या वर्षीच्या व्हॅलेंटाईन डेला आपल्या डोळांच्या अदांनी अनेकांना घायाळ केल्यानंतर अभिनेत्री प्रिया प्रकाश एका रात्रीत सोशल मीडिया सेन्सेशन झाली. त्यानंतर आता ती पुन्हा एकदा धुमाकूळ घालण्यास सज्ज झाली आहे. कारण तिच्या आगामी चित्रपटातला लीप लॉक सीन सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तो मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

प्रिया प्रकाशच्या ओरु अडार लव्ह या आगामी चित्रपटातील गाण्याचे तेलुगू व्हर्जन रिलीज झाले आहे. या गाण्याची सोशल मीडियावर चर्चा तर आहेच, शिवाय एका किसिंग सीनचीही तेवढीच चर्चा आहे. या सीनमध्ये तिचा कोस्टार रोशन अब्दुल राउफने तिला किस केल्याचे दिसत आहे.

Leave a Comment