मध्य प्रदेशात राहुल गांधी झाले राम, तर नरेंद्र मोदी रावण

rahul-gandhi
भोपाळ: पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वारंवार राफेल विमान खरेदी प्रकरणावरुन काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी निशाणा साधत आहेत. मध्य प्रदेशात याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने लावलेल्या पोस्टरमुळे खळबळ माजली आहे. नरेंद्र मोदींना या पोस्टरवर रावणाच्या रुपात दाखवण्यात आले आहे. तर रामाच्या रुपात राहुल गांधींना दाखवण्यात आले आहे. मोदींच्या दिशेने राहुल गांधी बाण मारण्यास सज्ज झाल्याचे या पोस्टरवर दिसत आहे.

राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदी यांनी काल एकमेकांवर जोरदार शाब्दिक हल्ले चढवल्यानंतर आज मध्य प्रदेशात काँग्रेसने पोस्टर लावून मोदी आणि भाजपावर निशाणा साधला. यामधून काँग्रेसने राफेल डील आणि राम मंदिर असे दोन मुद्दे उपस्थित केले आहेत. मोदींना यामध्ये रावणाच्या रुपात दाखवण्यात आले आहे. मोदींची पोस्टरवर दहा तोंडे दिसत आहेत. यावर भाजपा अध्यक्ष अमित शहा, अरुण जेटली, गृहमंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे चेहरे पोस्टरवर दिसत आहेत. या पोस्टरवर ‘चोरो तुम्हारी खैर नहीं, हम राम भक्त है. चोरों के अलावा किसी से बैर नहीं’, असा मजकूर आहे. याशिवाय एका राफेल विमानासह ‘चौकीदार ही चोर है’ ही राहुल गांधींनी दिलेली घोषणादेखील पोस्टरवर आहे.

Leave a Comment