उत्तर प्रदेशमध्ये आगामी काळात खूप काही होणार आहे – योगी आदित्यनाथ

yogi-aadityanath
पाटणा – बिहारमध्ये गुरुवारी राम मंदिराची निर्मिती तिथेच होईल जिथे भगवान रामाचा जन्म झाला होता. उत्तर प्रदेशमध्ये येणाऱ्या काळात खूप काही होणार आहे. चिंता करू नका, मर्यादा पुरूषोत्तम श्रीरामाचे मंदिर त्याच स्थानावर होईल, यात कोणतीच शंका नाही, असे वक्तव्य केले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आहे.

गुरुवारी पूर्णिया येथे बूथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. भगवान रामाच्या जन्मस्थानी येणारे भाविक आता अयोध्येत येतात. फैजाबाद जिल्ह्यात जात नाहीत आणि कुंभ मेळ्याला येणारे प्रयागराजला येतात अलाहाबादला नाही. उत्तर प्रदेशमध्ये येणाऱ्या काळात खूप काही होणार आहे. चिंता करू नका, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

नितीशकुमार आणि सुशील मोदींच्या नेतृत्वाखाली बिहारमधील सरकारच्या कामगिरीमुळे सामान्य लोकांचे बिहारबाबतच्या धारणेत परिवर्तन झाले आहे. विरोधकांसारखे देश तोडण्याची भाषा आम्ही करत नाही, असेही योगी म्हणाले. तसेच आम्ही शहीद होणाऱ्या आमच्या प्रत्येक जवानांसाठी सीमेपलिकडचे 100 सैनिक मारण्यावर विश्वास ठेवतो, असे सांगितले. यावेळी त्यांनी बिहारच्या नागरिकांना कुंभमेळ्याला जाऊन उत्तर प्रदेश सरकारकडून करण्यात आलेले परिवर्तन पाहण्याचे आवाहन केले.

Leave a Comment