९७ व्या वर्षी मॉडेलिंगसाठी करार

model
अमेरिकेतील मॉडेल आयकॉन आयरिस एफ्फेल या महिलेने ९७ व्या वर्षी जगातील बलाढ्य मॉडेल मॅनेजमेंट कंपनी आयएमजी बरोबर करार करून नवा उच्चांक स्थापला आहे. एफ्फेल सांगते, ही अचिव्हमेंट खूपच उत्साहवर्धक असून या वयात हे घडेल असे स्वप्नातही वाटले नाही. सर्व काही अचानक झाले. या वयात मी मॅगेझिनची कव्हर गर्ल बनणार याचा आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही.

एफ्फेलच्या मते निवृत्त होणे हे मृत्यूपेक्षा भयावह आहे. कुणीच कधी निवृत्तीचा विचार करू नये. २९ ऑगस्ट १९२१ रोजी जन्मलेली एफ्फेल अम्रीकन बिझिनेस, इनटीरीअर डिझायनर आणि फॅशन आयकॉन म्हणून प्रसिद्ध आहे. ती गीगी हदीद, गिसेल बुन्दचेन, लिली एल्ड्रीज, हलीमा अदन अश्या नामवंत ब्रांडसाठी काम करणार आहे. ती म्हणते मॉडेलिंगचे काम मला आवडते आणि या कामावर माझे प्रेम आहे. तिच्या नावावर एक डॉक्यूमेंटरी २०१४ मध्ये तयार केली गेली आहे.

Leave a Comment