क्रिस्तियानो रोनाल्डोचे डोळे दिपविणारे कार कलेक्शन

cristiano-ronaldo
फुटबॉल, मैत्रिणी आणि करचुकवेगिरी यामुळे नेहमीच चर्चेत असलेला जगातील महान फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डो त्याच्या संग्रही असलेल्या महागड्या आणि अलिशान कार्सच्या ताफ्यामुळेहि चर्चेत राहिला आहे. रोनाल्डोचे कार कलेक्शन विलक्षण आणि वेगळेच आहे. ५ फेब्रुवारीला ३४ व वाढदिवस साजरा केलेल्या रोनाल्डोला वेगवान कार्सचे आकर्षण असणे स्वाभाविक म्हणावे लागेल. कारण तो स्वतः १३० किमीच्या वेगाने फुटबॉलला किक मारू शकणारा महान खेळाडू आहे.

cristiano
रोनाल्डोच्या संग्रही ताशी ४२० किमी वेगाने धावणारी ८ लिटर इंजिन असलेली बुगाटी व्हेरोन ही १२ कोटी रुपये किमतीची कार आहे. तसेच अॅस्टन मार्टिन डीबी ९ ही ताशी २९५ किमी वेगाने धावणारी १.९० कोटीची कारही आहे. याशिवाय त्याच्या ताफ्यात ताशी ३३० किमी वेगाने जाणारी ऑडी आर ८ हि २.७२ कोटीची कार, लोम्बार्गिनी अॅव्हेंडर रोडस्टर एलपी ७०० ही ताशी ३५० किमी वेगाने जाणारी ५.१ कोटीची कारही आहे.

याशिवाय त्याच्याकडे बेंटली जीटी स्पीड ही ताशी ३१८ किमी वेगाने जाणारी ३.५८ कोटीची कार तसेच फेरारी ५९९ जीटीबी फिआर्नो, फेरारी ४३०, रोल्स रोईस फँटम, बीएमडब्ल्यू एम ६, बेन्टले काँटीनेन्टल जीटी, मर्सिडीज बेंज सी क्लास, स्पोर्ट्स कुपे, पोर्शे केयनेन टर्बो, ऑडी क्यू ७, मर्सिडीज बेंझ सी २२० अश्याही कार्स आहेत.

Leave a Comment