जगात या धर्माचे लोक सर्वाधिक

religion
जगात अनेक धर्म समुदायाचे लोक राहतात. काही ठिकाणी ठराविक धर्माच्या लोकांचे प्राबल्य आहे तर काही देशात हेच लोक अल्पसंख्यांक आहेत. हे आकडे सतत बदलते असतात. तरीही माहिती म्हणून जेव्हा आपण याचा शोध घेतो तेव्हा असे दिसते कि जगात या घडीला ख्रिश्चन धर्म मानणारे लोक सर्वाधिक असून त्यांची संख्या जगाच्या एकूण लोकसंख्येत ३१.५ टक्के म्हणजे २.२ अब्ज इतकी आहे. विशेष म्हणजे ख्रिश्चन धर्मात जन्मलेला माणूस जन्मजात ख्रिश्चन नसतो तर बाप्तिस्मा झाल्यानंतर तो ख्रिश्चन बनतो.

आज जगात इस्लाम धर्माचा प्रचार आणि प्रसार जोरात सुरु असून आज घडीला या धर्माचे १.६ अब्ज लोक असून हा धर्म लोकसंख्येच्या दृष्टीने दोन नंबरवर आहे. हिंदू धर्म तीन नंबरवर असून हा धर्म मानणारे १ अब्ज लोक आहेत. त्यांची टक्केवारी १३.९५ आहे. चीनी पारंपारिक धर्म मानणारे ३९.४ कोटी लोक असून बौद्ध धर्म मानणारे ३७.६ कोटी लोक आहेत.

आफ्रिकेत पारंपारिक धर्म मानणारे ४० कोटी लोक असून शीख धर्माचे २.३ कोटी लोक आहेत. ज्यू धर्मीयांची संख्या १.४ कोटी तर जैन धर्मीय ४२ लाख आहेत. जपान मधील शिंटो धर्माचे पालन करणारे ४० लाख लोक आहेत.

Leave a Comment