कुठून आली ‘उरी’मधील ‘हाऊ इज द जोश’ या संवादाची कल्पना ?

vicky-kaushal
विकी कौशलच्या अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटातील ‘हाऊ इज द जोश’ हा डायलॉग प्रचंड गाजला. हा डायलॉग सोशल मीडियापासून गल्लीबोळापर्यंत पोहोचला. ‘उरी’चा हा संवाद अगदी राजकारण्यांमध्येही लोकप्रिय झाला. या संवादाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून तर त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांच्या भाषणातही स्थान मिळवले.

पण या संवादाची कल्पना कुठून आणि कशी आली? यामागेही एक मजेशीर बाब आहे. हा किस्सा चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर यांनी सांगितला आहे. आदित्यने सांगितले की, माझे काही मित्र डिफेन्स बॅकग्राऊंडचे होते. मी त्यांच्यासोबत अनेकदा आर्मी क्लबमध्ये जायचो. दिल्लीत एक असे ठिकाण होते, तिथे आम्ही नाताळ व नवे वर्ष साजरे करायचो. एक माजी ब्रिगेडियर याठिकाणी यायचे. आम्हाला पाहून ते हा डायलॉग म्हणायचे आणि त्यांच्या हातात चॉकलेट असायचे. ते ‘हाऊ इज द जोश?’ असे विचारायचे. यावर आम्ही ‘हाई सर’, असे उत्तर द्यायचो. आमच्यापैकी ज्याचा आवाज सगळ्यात तगडा असायला, त्याला ते चॉकलेट मिळायचे. खाण्याचा मी शौकीन असल्यामुळे अगदी छाती फाडून मी त्यांच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचो आणि दरवेळी चॉकलेट मलाच मिळायचे. मी हाच ‘उरी’त डायलॉग वापरला. पण हा डायलॉग एवढा लोकप्रिय होईल याची मलाही कल्पना नव्हती. सैन्यात या लाईनचा वापर फार कमी लोक करतात. या लाईनचा मी योग्य वापर केला आणि ही लाईन एका वेगळ्या उंचीवर पोहोचली. ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ची स्क्रिप्ट लिहिणे सुरु केले, तेव्हाच हा डायलॉग वापरायचा हे मी ठरवून टाकले होते. या डायलॉगमध्ये माझ्या आठवणी आहेत, असेही आदित्यने सांगितले.

Leave a Comment