9 मार्चला आकाश अंबानी आणि श्लोका मेहताचा विवाह

aakash-ambani
9 मार्चला मुंबईत प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी आणि व्यापारी रसेल मेहता यांची मुलगी श्लोका मेहता या दोघांचे लग्न होणार आहे. जिओ वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये तीन दिवस लग्न समारंभ असणार आहे. संध्याकाळी 3.30 वाजता मुंबईतील जिओ सेंटरमध्ये आकाश अंबानीच्या लग्नाची वरात जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

लग्नसोहळा 9 मार्चला पार पडल्यानंतर 10 मार्चला वेडिंग सेलिब्रेशन होणार आहे. जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तर 11 मार्चला वेडिंग रिसेप्शन असणार आहे. यावेळी दोन्ही परिवार आणि जवळचे मित्रमंडळी असणार आहेत. रिसेप्शन सोहळाही जिओ सेंटर येथे होणार आहे.

आकाश लग्न सोहळ्याआधी आपल्या मित्रांना स्वित्झर्लंडमध्ये बॅचलर पार्टी देणार आहे. त्याच्या जवळच्या मित्रांचा ज्यामध्ये समावेश असेल. आकाश अंबानी या पार्टीसाठी लवकरच स्वित्झर्लंडला जाणार आहे. 23 ते 25 पर्यंत ही पार्टी चालणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या बॅचलर पार्टीमध्ये बॉलीवूड सेलिब्रिटींचाही समावेश असणार आहे. रणबीर कपूर आणि करण जोहर सुद्धा स्वित्झर्लंडला जाणार आहेत. ही पार्टी स्वित्झर्लंडमधील St. Moritz येथे आयोजित करण्यात आली आहे. आकाश अंबानीचा रणबीर कपूर हा जवळचा मित्र असल्याचे बोलले जाते. आकाशची करण जोहरसोबतही चांगली बाँडिंग आहे. विशेष म्हणजे लोकेशनजवळ 500 पाहुण्यांना घेऊन जाण्यासाठी दोन फ्लाईट्स बूक करण्यात आल्या आहेत.

Leave a Comment