शेकाप नेत्याचा 18 महिलांवर बलात्कार

rape
नवी मुंबई : नवी मुंबईच्या एनआरआय पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली शेकापचा नेता श्रीराग कमलासनन उर्फ श्री याला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपी श्रीराग कमलासननच्या लॅपटॉपमधून 560 हून अधिक महिलांचे अश्लिल फोटो, व्हिडीओही जप्त करण्यात आले. नवी मुंबईच्या एनआरआय पोलिसांनी एका पीडित महिलेच्या तक्रारीनंतर ही कारवाई केली.

नवी मुंबईतील उल्वे परिसरात श्रीराग कमलासनन उर्फ श्री हा राहतो. श्रीराग कमलासनन शेकापच्या केरळ सेलचा अध्यक्ष आहे. श्रीराग कमलासनन उर्फ श्री याच्याशी रिअल इस्टेच्या कामानिमित्त नवी मुंबईतील उल्वे येथे राहणाऱ्या महिलेची ओळख झाली. श्रीरागने 2017 साली महिलेला त्याच्या कार्यालयात बोलावलं. उल्वे येथे नोकरी करण्यास श्रीरागने महिलेला सांगितले. आपल्या मुलाची शाळा उल्वेतच असल्याने महिलाही तिथे येऊन राहू लागली आणि नंतर रिअल इस्टेटच्या व्यवसायातही उतरली. श्रीराग आणि महिलेमधील जवळीक याचवेळी वाढली. महिलेची संपूर्ण माहिती श्रीरागने गोळा केली आणि लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने बलात्कार करु लागला.

महिलेला श्रीराग मारहाणही करायचा, तसेच मुलाचे अपहरण करण्यची धमकीही द्यायचा. त्यामुळे भीतीपोटी महिलेने कधीच पोलिसात किंवा कुठेच तक्रार केली नाही. मात्र, वारंवार होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून 4 फेब्रुवारी रोजी महिलेने एनआरआय पोलिस ठाण्यात श्रीरागविरोधात तक्रार दाखल केली. श्रीरागच्या कार्यालयाचीही झाडाझडती घेण्यात आली. तिथे एक लॅपटॉप सापडला. त्यातून 560 हून अधिक महिलांचे अश्लिल फोटो जप्त करण्यात आले.

आतापर्यंत 18 पीडित महिला या प्रकरणात समोर आल्या आहेत, श्रीरागने ज्यांच्यावर बलात्कार केला आहे. नवी मुंबईतील एनआरआय पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली. त्यानंतर पोलिसांनी 5 फेब्रुवारीला श्रीरागला अटक करुन न्यायालयात हजर केलं. न्यायालयाने श्रीरागला पोलिस कोठडी सुनावली आहे.

Leave a Comment