तुम्ही पाहिला आहे का ‘टोटल धमाल’च्या गाण्याचा मेकिंग व्हिडीओ!

total-dhaamal
प्रदर्शनापूर्वीच अजय देवगणचा आगामी ‘टोटल धमाल’ हा चित्रपट ‘धमाल’ करत आहे. सध्या या चित्रपटाच्या व्हिडिओ व फोटोंनी सोशल मीडियावर धूम केली आहे. या चित्रपटाच्या गाण्याचा एक मेकिंग व्हिडीओ सुद्धा वेगाने व्हायरल होत आहे.

अजयचा हा ‘धमाल’ चित्रपट याच महिन्यात २२ फेब्रुवारीला हा रिलीज होणार आहे. तत्पूर्वी चित्रपटाचा ट्रेलर व अनेक गाणी रिलीज करण्यात आली आहेत. त्यापैकीच ‘पैसा ये पैसा’ हे एक गाणे आहे. ‘टोटल धमाल’च्या अख्ख्या टीमने या गाण्यात धमाकेदार परफॉर्मन्स केला आहे. पण हे काही मिनिटांचे गाणे तयार करण्यासाठी या टीमला किती कष्ट करावे लागले, हे तुम्हाला ठाऊक आहे? नसेल तर तुम्ही या गाण्याचा हा मेकिंग व्हिडीओ पाहायलाच हवा. हा व्हिडीओ खुद्द अजयने शेअर केला आहे.

अजय देवगणशिवाय या चित्रपटात माधुरी दीक्षित, अनिल कपूर, अर्शद वारसी, रितेश देशमुख, जावेद जाफरी, जॉनी लिव्हर आदी कलाकार आहेत. ‘टोटल धमाल’च्या निमित्ताने अनिल आणि माधुरी दीक्षित जवळपास 26 वर्षांनंतर एकत्र स्क्रीन शेअर करत आहेत. माधुरी आणि अनिल कपूर दोघे ‘टोटल धमाल’मध्ये नवरा-बायकोच्या भूमिकेत दिसणार आहेत. अनिल कपूर यात अविनाश नावाच्या व्यक्तीची भूमिका साकारतो आहे.