बौद्ध भिख्खु ते ट्रान्सजेंडर मॉडेलचा प्रवास…

Tenzin-Mariko
बौद्ध भिख्खु तेनजिन मारिको सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. ही तिबेटची पहिली ट्रान्सजेंडर मॉडेल आहे. तेनजिनचा जन्म एक पुरुष म्हणुन झाला होता. तिला सहा भाऊ होते. साल 1990 रोजी हे कुुटुंब हिमाचल प्रदेशात राहण्यास आले होते.
Tenzin-Mariko2
तेनजिन म्हणाली की, माझ्या आयुष्याचा सुरुवातीचा काळ खुप कठीण होता. मी महिलांच्या वस्तुकडे आकर्षित होत होते.
तेनजिना नऊ वर्षीची असताना तिला बौद्ध मठामध्ये पाठविण्यात आले होते. पण तेथे महिलांच्या वस्तुकडचे तिचे आकर्षण कमी झाले नाही. म्हणुन तिने ट्रान्सजेंडर बनण्याचा विचार केला.
Tenzin-Mariko1
तेनजिनला म्हणते की, मी ट्रान्सजेंडर बनण्याचा निर्णय घेतला त्यावेळी माझ्यासमोर आर्थिक आणि सामाजिक असे दोन आव्हाने होती. 2014 मध्ये मी ट्रान्सजेंडर बनण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, तिचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर तिने बौद्ध भिख्खू सोडुन दिले. वर्ष 2015 मध्ये तिने लिंगपरिवर्तन शस्त्रक्रिया केली. त्यानंतर धर्मशाला येथील मिस तिबेट पेजेंटमध्ये तेनजिनने डान्स केला तेव्हा ती महिलेच्या रुपात सर्वान समोर आली.
Tenzin-Mariko3
त्यानंतर तिने कधी मागे वळून पाहिले नाही. आज सोशल मीडियामध्ये तेनजिनचे लाखो फॉलोअर आहेत. तिने आपल्या देशातील आणि भारतातील अनेक ट्रान्सजेंडर लोकांना आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रेरीत केले.
Tenzin-Mariko4
तेनजिन म्हणाली की, मला पहिली तिबेट ट्रान्सजेंडर म्हणून ओळख मिळली आहे. आता मला एक सेलिब्रिटी मानले जाते. सध्याच्या घडीला मी एक सेलिब्रेटी म्हणून ओळखली जाते. मला पहिली तिबेटची ट्रान्सजेंडर म्हणून ओळख मिळाल्याचा जेवढा आनंद नाही तेवढा आनंद मला एक सेलिब्रेटी झाल्यामुळे होत आहे. त्याचबरोबर माझ्यामुळे इतर लोकांना देखील प्रेरणा मिळत आहे.