कुलपॅडचा कुल ३ स्मार्टफोन लाँच

cool
चीनी स्मार्टफोन कंपनी कुलपॅडने नवा स्मार्टफोन कुल ३ नावाने भारतात लाँच केला असून ५९९९ रुपये किंमत असलेल्या या फोनला अनेक खास फिचर दिली गेली आहेत.

या फोनला ५.७ इंची एचडी प्लस डिस्प्ले, २ जीबी रॅम, १६ जीबी स्टोरेज, ड्यू ड्रॉप नॉच, ग्लॉसी पॅक पॅनल, अँड्राईड ९.० पाय ओएस, ८ व ०.३ एमपीचे ड्युअल रिअर कॅमेरे, ५ एमपीचा सेल्फी कॅमेरा तसेच बॅक पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर, फेस अनलॉक फिचर दिले गेले आहे. मिडनाईट ब्ल्यू, ओशन इंडिगो आणि टील ग्रीन तसेच रुबी ब्लॅक अश्या आकर्षक रंगात तो उपलब्ध करून दिला गेला आहे.

Leave a Comment