या शिवलिंगाची हिंदू आणि मुस्लीम करतात पूजा

shivling
देवांचे देव महादेव. भारतात शिवभक्तांची संख्या कोट्यावधी मध्ये असेल. महाशिवरात्र आता जवळ आली आहे आणि त्यादिवशी महादेवाची पूजा करण्यासाठी देशभरातील शिवमंदिरात गर्दी उमडेल. शिव, शंकर, महादेव, नीलकंठ अश्या अनेक नावानी ओळखल्या जाणाऱ्या या भोलेनाथाचा महिमा अगाध आहे. उत्तरप्रदेशातील सरया तिवारी या गावात एक अद्भुत शिवलिंग असून या शिवलिंगाची पूजा केवळ हिंदूच नाही तर मुस्लीम बांधवही करतात. या मंदिराला झारखंडी अथवा नीलकंठ महादेव मंदिर असे म्हटले जाते.

shivling1
या मंदिरातील शिवपिंडी प्राचीन आणि स्वयंभू आहे. या मंदिरात मुस्लीमही पूजा करतात कारण या शिवलिंगावर पवित्र कलमा खोडले गेले आहेत. त्याची कहाणी अशी सांगतात, महमद गझनी जेव्हा भरावर आक्रमण करून आला तेव्हा त्याने देशातील मंदिरे फोडून टाकण्याचा धडाका लावला होता. तो या मंदिरात आला तेव्हा त्याने मंदिर पाडून टाकले आणि सैनिकांना शिवपिंड उखडून टाकण्याचे आदेश दिले. मात्र सैनिक पिंड उखडण्यासाठी जेवढे खोल खणू लागले तेवढे शिवलिंग वाढायला लागले. या पिंडीवर तलवारीने वार केले गेले तेव्हा तेथून रक्त येऊ लागले. पण गझनी ही पिंडी फोडू शकला नाही.

अखेर त्याने या शिवलिंगावर कुराणातील कलमा खोदून घेतल्या. त्यामुळे आत्ता हिंदू या शिवलिंगाची पूजा करणार नाहीत असे त्याला वाटले. पण प्रत्यक्षात उलटे घडले. हिंदू हे शिवलिंग पुजत राहिलेच पण मुस्लीमही त्याची पूजा करू लागले. त्यामुळे हे मंदिर सांप्रदायिक सौहार्दाचे प्रतिक बनून राहिले आहे.

Leave a Comment