माझ्या हिंमतीसाठी राहलु गांधींच्या प्रमाणपत्राची गरज नाही – नितीन गडकरी

nitin-gadkari
नवी दिल्ली- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर माझ्या हिंमतीला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नसल्याचे म्हणत आमच्या सरकारचे मोदीजी यश आहेत. तुम्हाला आमच्यावर हल्ला करण्यासाठी खांदे शोधावे लागत आहेत, अशा शब्दात पलटवार केला आहे.

तसेच मला माझ्या हिंमतीसाठी तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही. पण आश्चर्य या गोष्टीचे वाटते की, एका राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष असूनही आमच्या सरकारवर हल्ला करण्यासाठी तुम्हाला मिडियाकडून टि्विस्ट केलेल्या बातम्यांचा सहारा घ्यावा लागतो. तत्पूर्वी राहुल गांधींनी भाजपात एकट्या गडकरींमध्येच खरे बोलण्याची हिंमत असल्याचे वक्तव्य केले होते. गडकरींनी त्याचेच प्रतिउत्तर टिव्हीच्या माध्यमातून दिले आहे.

आमच्या सरकारने राफेलमध्ये देशाचे हित समोर ठेऊन पारदर्शक व्यवहार केल्यामुळे शेतकरी ज्या अवस्थेत सापडला आहे त्यातून त्याला बाहेर काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न मोदी करत आहेत आणि त्यात आम्हाला यशही मिळत आहे. तुमच्यासारख्या काही लोकांना मोदी पंतप्रधान पदावर नको असल्यामुळे असहिष्णुता आणि संवैधानिक संस्थांवर हल्ल्यांची स्वप्ने तुम्हाला पडत असल्याचेही गडकरी म्हणाले. राहुल गांधीनी यापूर्वी ट्विटरवर गडकरींना राफेल घोटाळा, शेतीसंकट, स्वायत्त संस्थांवरील हल्ले तसेच बेरोजगारीवरही आपले मत मांडण्याचे आव्हान केले होते.

Leave a Comment