व्हिडिओ ः केजोला माहीचा मराठीतून सल्ला

kedar-jadhav
वेलिंग्टन : काल वेलिंग्टनमध्ये खेळल्या गेलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा माजी कर्णधार तसेच यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनीचा एक खास अंदाज पाहायला मिळाला. महेंद्रसिंह धोनी अखेरच्या एकदिवसीय सामन्यात केदार जाधवला यष्टीमागून चक्क मराठीतून सल्ला देताना दिसला. त्याचा हाच व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


धोनी आत्तापर्यंतच्या बऱ्याच सामन्यादरम्यान टीम इंडियाच्या गोलंदाजांना मार्गदर्शन करताना दिसतो. धोनी तेच करताना कालच्या सामन्यातही दिसून आला. धोनीने सामन्याच्या दुसऱ्या डावात केदारला, पुढे नको भाऊ…घेऊन टाक! अशाप्रकारचे मराठमोळे सल्ले यष्टींमागून दिले. या आधीही आपल्या खास शैलीत गोलंदाजांना मार्गदर्शन करताना धोनी दिसून आला असल्यामुळे धोनीच्या फिटनेस बरोबर त्याच्या यष्टींमागून दिलेल्या मार्गदर्शनाचीसुद्धा चर्चा होताना दिसून येत आहे.

Leave a Comment