व्हिडिओ; टीम इंडियावर देखील ‘उरी’चा प्रभाव

team-india
अखेरच्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने न्यूझीलंडवर ३५ धावांनी विजय मिळवत, ४-१ च्या फरकाने मालिका आपल्या नावेवर केली. अंबाती रायुडू, हार्दिक पांड्या, विजय शंकर, केदार जाधव यांनी फलंदाजीमध्ये तर युजवेंद्र चहल, हार्दिक पांड्या यांनी गोलंदाजीत कमाल दाखवली. टीम इंडिया मालिका विजयानंतर पुरस्काराचा चषक हातात घेऊन ग्रुप फोटोसाठी एकत्र आली, ‘उरी’ या चित्रपटातील How’s the Josh?? हा डायलॉग यावेळी संघाने म्हणत उपस्थितांची दाद मिळवली. सध्या सोशल मीडियावर या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.


दरम्यान, अखेरच्या एकदिवसीय सामन्यात यजमान न्यूझीलंड संघाला गोलंदाजांनी केलेल्या शिस्तबद्ध माऱ्यापुढे 253 धावांचे लक्ष्य पूर्ण करता आले नाही. भारताने अखेरचा एकदिवसीय सामना 35 धावांनी जिंकत 5 एकदिवसीय सामन्यांची मालिका 4-1 ने जिंकली आहे. भारतीय संघाने तब्बल 10 वर्षांनंतर न्यूझीलंडमध्ये एकदिवसीय मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे.

Leave a Comment