पाहा बॉलिवूड सेलिब्रिटींचे हटके मंगळसूत्र !

mangalsutraगेल्या वर्षभरापासून बॉलिवूडमध्ये लग्नाचे सनईचौघडे वाजत आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण पासून ते प्रियांका चोप्रापर्यंत अनेक अभिनेत्रींनी या वर्षभरामध्ये आपला जोडीदार निवडला. या साऱ्याच अभिनेत्रींच्या लग्नाची जोरदार चर्चाही चाहत्यांमध्ये झाली. अगदी त्यांच्या लग्नातील विधींपासून ते त्यांच्या मंगळसूत्रापर्यंत. चला तर मग पाहुयात या अभिनेत्रींचे हटके मंगळसूत्र….

अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी लेक कोमा येथे डेस्टीनेशन वेडिंग केले. या लग्नात दीपिकाने घातलेले मंगळसूत्र तब्बल 20 लाख रुपयांचे असल्याचे सांगण्यात येत आहे.
deepika-padukone
अभिनेत्री प्रियांका चोप्राने अमेरिकन गायक निक जोनाससोबत लग्नगाठ बांधली. जोधपूरमध्ये 1 आणि 2 डिसेंबर रोजी प्रियांकाने ख्रिश्चन आणि हिंदू अशा दोन्ही पद्धतीने लग्न केले. सोहळ्यामध्ये प्रियांकाचे मंगळसूत्र हे आकर्षणाचा विषय ठरला. प्रियांकाने निवडलेल्या मंगळसूत्रात ‘वॉटर ड्रॅप शेप’चं पेण्डंट असून यामध्ये एक डायमंड बसविण्यात आला आहे. हे पेण्डंट सोन्याच्या चेनमध्ये गुंफण्यात आले आहे. साधे वाटणारे हे मंगळसूत्र कोट्यावधी रुपयांचे असल्याचे सांगण्यात येत आहे.
Priyanka-Chopra
बॉलिवूड सोनम कपूरने प्रियकर आनंद आहुजासोबत लग्न केले आहे. विशेष म्हणजे सोनमने स्वत: तिचे मंगळसूत्र डिझाइन केले असून यात आनंद आणि तिच्या राशीच्या चिन्हाचा समावेश केला आहे.
sonam-kapoor
अभिनेत्री ऐश्वर्या रायने 20 एप्रिल 2007 मध्ये अभिनेता अभिषेक बच्चन याच्याशी लग्नगाठ बांधली. या लग्नात ऐश्वर्याने घातलेल्या मंगळसूत्राची किंमत तब्बल 45 लाख रुपये होती. या मंगळसूत्रामध्ये हिरे जडविण्यात आले होते.
aishwarya-rai

Leave a Comment