व्हिडीओ ; महिला खासदारांनी लुटला पारंपारिक खेळाचा आनंद

woman-mp
मुंबई: शुक्रवारी संसदेत मोदी सरकारने त्यांचे शेवटाचे आणि देशाचे 2019-20चा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. अनेक महिला खासदारांनी अर्थसंकल्पानंतर एकत्र जेवण केले. यावेळी विविध पक्षाच्या महिला खासदार एकत्र पाहायला मिळाल्या. या महिला खासदारांनी जेवणानंतर थोडासा विरंगुळा म्हणून पारंपारिक खेळाचा आनंद लुटला.

यावेळीचा एक व्हिडीओ केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार हरसिमरत कौर बादल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी, अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल, भाजप खासदार किरण खेर, द्रमुक खासदार कनीमोळी, केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल या सर्वजणी मिळून एकमेकींचा हात पकडून गिद्दा खेळताना या व्हिडीओमध्ये दिसल्या. स्मृती इराणी आणि हरसिमरत कौर बादल यांनी यानंतर फुगडीही खेळली.


हरसिमरत कौर यांनी आपल्या ट्विटमध्ये आयुष्याने आमच्यावर काल दुपारी जादू केली, दुपारच्या नियमित जेवणानंतर एक वेळ आली, तिने आम्हाला बालपणीची आठवण करुन दिली, असे म्हटले आहे. एकमेकांच्या विरोधात राजकीय नेते राजकारण करत असले तरी राजकारणापलिकडचेही संबंध असू शकतात, हे या व्हिडीओवरुन पुन्हा एकदा दिसून येते. हा व्हिडीओ शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता ट्विट करण्यात आला.

Leave a Comment