यामुळे दिव्यांका त्रिपाठी झाली ट्रोल

divyanka-tripathi
टेलिव्हिजन क्षेत्रातील अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी सध्या ट्रोल होत आहे. दिव्यांका सोशल मीडियावर अनेक फोटो किंवा व्हिडिओ शेअर करत असते. आता दिव्यांकाने शेअर केलेल्या एका फोटोमुळे ती ट्रोल होत आहे.

दिव्यांका त्रिपाठीने एका कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोमध्ये दिव्यांकाने व्हाईट गोल्डन रंगाचा गाऊन घातला होता. या गाऊनवर तिने एक बेल्टही लावला होता. हा बेल्ट पाहुन नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यासाचीला तिने कॉपी केल्याचे अनेकांनी म्हटले आहे. फॅशन डिझायनर सब्यासाचीच्या प्रत्येक ड्रेसवर त्याचा रॉयल बंगाल टायगरचा ट्रेडमार्क असतो. दिव्यांकाने परिधान केलेल्या बेल्टवरही असाच रॉयल बंगाल टायगरचा लोगो होता. त्यामुळे दिव्यांकाने सब्यासाची यांची डिझाइन कॉपी केल्याचे अनेकांनी म्हटले आहे.

या प्रकरणी आता दिव्यांका त्रिपाठीने नेटकऱ्यांची माफी मागितली आहे. दिव्यांका म्हणाली की, ‘मी जो बेल्ट घातला होता. तो कोणत्या तरी ब्रॅण्डचा ट्रेडमार्क आहे हे मला माहित नव्हते. मला एका नेटकऱ्याने या विषयी विचारले त्यावेळी मला या ट्रेडमार्क विषयी समजले. पण झालेल्या या प्रकारामुळे मी मनापासून साऱ्याची माफी मागते’, असे दिव्यांका म्हणाली आहे.

Leave a Comment