न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात खेळणार धोनी

mahendra-singh-dhoni
वेलिंग्टन – न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या व अंतिम सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज महेंद्र सिंह धोनी खेळणार असल्याची माहिती भारतीय फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी दिली आहे. तो तिसऱ्या आणि चौथ्या एकदिवसीय सामन्यात स्नायू दुखावल्यामुळे खेळू शकला नव्हता.

तो चौथ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी सराव करताना दिसून आला. पण अंतिम ११ जणाच्या संघात तो खेळू शकला नाही. दिनेश कार्तिकला त्याच्या जागी संघात घेतले होते. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात धोनीने ३३ चेंडूत ४८ धावांची खेळी केली होती. भारताने ही मालिका आधीच जिंकली आहे. पण चौथ्या सामन्यात भारताचा दारुण पराभव झाला आहे.

धोनीच्या जागी तिसऱ्या सामन्यात दिनेश कार्तिक खेळला होता. त्याने मॅचविनिंग खेळी केली होती. चौथ्या सामन्यात मात्र, त्याला भोपळाही फोडता आला नाही. पाचव्या सामन्यात धोनी संघात परतल्यास भारताचे पारडे जड होईल. या एकदिवसीय मालिकेनंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ३ सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली संघ मैदानात उतरणार आहे. पहिला टी-२० सामना वेलिंग्टन, ६ फेब्रुवारी दुसरा टी-२० ऑकलंड आणि तिसरा हॅम्लिटन येथे १० फेब्रुवारी येथे होणार आहे.

Leave a Comment