प्रेक्षकांच्या भेटीला आला ‘आनंदी गोपाळ’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर

anandi-gopal
पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान मिळविणा-या डॉ. आनंदीबाई जोशी यांचे नाव फक्त भारतापुरतचे मर्यादीत नाहीत जगभरात हे नाव परिचयाचे आहे. डॉक्टर होण्यासाठी त्यांना अनेक अडचणींचा व संकटांचा सामना करावा लागला होता. त्यांचे वयाच्या ९ व्या वर्षी गोपाळरावांशी लग्न झाले. गोपाळराव विधुर होते आणि वयाने आनंदीबाईंपेक्षा तिप्पट मोठे होते. वैद्यकीय संसाधने उपलब्ध नसल्याने आनंदीबाईना वयाच्या १४ व्या वर्षी प्रसूतीच्या वेळी त्यांच्या पहिल्या मुलाला गमवावे लागले. त्यांनी त्याच क्षणाला डॉक्टर होण्याचा निर्धार केला. आपल्या बायकोला शिकवण्याचे ध्येय गोपाळरावांनी सुद्धा मनाशी बाळगले आणि त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहून त्यांना आपला पाठिंबा दिला. आता चित्रपटाच्या माध्यमातून रूपेरी पडद्यावर आनंदीबाईंचा हा प्रेरणादायी जीवनप्रवास उलगडण्यात येणार आहे. नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला ‘आनंदी गोपाळ’ चित्रपटाचा ट्रेलर आला आहे.

ललित प्रभाकर चित्रपटात गोपाळरावाची भूमिका साकारत आहे तर आनंदीबाई जोशींच्या भूमिकेत अभिनेत्री भाग्यश्री मिलिंद दिसत आहे. माझा धर्म ज्या देशास मान्य नाही, तो देश मला मान्य नाही, असे दमदार डायलॉगस ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहेत. आनंदीबाईंना गोपाळरावांनी मराठी, इंग्रजी आणि संस्कृत कशी लिहितात आणि वाचतात त्याचे शिक्षण दिले. वयाच्या दहाव्या वर्षी आनंदीबाई यांचे गोपाळराव जोशी यांच्याशी लग्न झाले होते. लग्नानंतर गोपाळरावांनी आनंदीबाईंना शिकविले. पुढे अमेरिकेत पाठवून त्यांचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या हा संपूर्ण प्रवास मोठ्या पडद्यावर पाहणे रोमांचकारी ठरणार आहे. हा चित्रपट १५ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment